Birthday Special : सैफ आधी ‘या’ खानवर करिना होती फिदा

जाणून घ्या तिच्या विषयी काही खास गोष्टी

अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे बेबो अर्थात करिना कपूर. आज २१ सप्टेंबर रोजी करिनाचा वाढदिवस आहे. २०१२ मध्ये तिने आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. सैफ आणि करिनाची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या दोघांची प्रेमकथाही तितकीच रंजक असल्याचं सांगण्यात येतं. मात्र करिनाने सैफला पसंत करण्यापूर्वी बॉलिवूडमधील दुसऱ्याच एका खानची निवड केल्याचं समोर आलं आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने साऱ्यांना घायाळ करणारी करिना कधीकाळी अभिनेता फरदीन खान याच्या प्रेमात असल्याचं समोर आलं आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘खुशी’ या चित्रपटादरम्यान करिना आणि फरदीनचं सूत जुळल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटाचं चित्रीकरणावेळी या दोघांची चांगली मैत्री झाली होती आणि याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. अनेक वेळा त्यांच्याविषयी चर्चाचादेखील रंगल्या होत्या. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. काही काळातच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र आजही या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं.

आज पतौडी कुटुंबाची सून असलेल्या करिनाचं नाव अभिनेता हृतिक रोशन आणि शाहिद कपूरसोबतही जोडलं गेलं होतं. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी करिना-हृतिकची जवळीकता वाढली होती. मात्र या गोष्टीची चुणूक हृतिकच्या पत्नीला सुझैनला लागल्यामुळे करिना-हृतिकच्या नात्यात दुरावा आला. विशेष म्हणजे त्यानंतर ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ या चित्रपटात ही जोडी शेवटी झळकली. त्यानंतर अद्यापही या जोडीने एकत्र स्क्रिन शेअर केलेली नाही.

दरम्यान, करिना आणि शाहिद कपूर यांच्या नात्याविषयी तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी स्क्रिन शेअर केली असून तब्बल ३ वर्ष ही जोडी एकमेकांना डेट करत होती. मात्र सैफ अली खानच्या येण्यामुळे या जोडीमध्ये दुरावा निर्माण झाला आणि ही जोडी अखेर विभक्त झाली. ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ -करिना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‘कुरबान’ चित्रपटातही या दोघांनी स्क्रिन शेअर केली. या चित्रपटामध्ये या दोघांची रोमॅण्टीक केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर तात्काळ या जोडीने लग्नाचा निर्णय घेता आणि ही जोडी विवाहबंधनात अडकली. सध्या ही जोडी त्यांच्या वैवाहिक आयुष्य जगत असून त्यांना तैमूर हा लहान मुलगादेखील आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kareena kapoor birthday know about kareena kapoor affairs avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या