तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीच्या पगाराबाबत करिना म्हणते…

तैमुरच्या नॅनीला मिळणाऱ्या पगाराबद्दल तिला विचारण्यात आलं होतं.

तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराबद्दल सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चर्चा रंगल्या होत्या. तैमुरच्या नॅनीला महिन्याला किमान लाखभर पगार मिळतो अशा चर्चा होत्या. अनेकांनी पगाराच्या आकड्याबद्दल अनेक तर्कविर्तक बांधले होते. यावर पहिल्यांदाचं करिनानं मौन सोडलं आहे.

अरबाज खानच्या चॅट शोमध्ये करीनाने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तैमुरच्या नॅनीला मिळणाऱ्या पगाराबद्दल विचारण्यात आलं होतं. तिनं नॅनीला मिळणाऱ्या पगाराबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. तिला इतका पगार मिळतो हे इतरांना कोणी सांगितलं हेच मला कळत नाही. जर तुमचं मुलं सुरक्षित आणि आनंदी असेल तर पैसे महत्त्वाचे नसतात’ असं म्हणत करिनानं एकप्रकारे उत्तर देणं टाळलं.

तैमुर लहान असल्यापासून नॅनी त्याच्यासोबत आहेत. त्यांना महिन्याला दीड ते पावणे दोन लाख रुपये पगार मिळतो अशा चर्चा तेव्हा सोशल मीडियावर होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kareena kapoor khan about the salary of taimur nanny

ताज्या बातम्या