करीना कपूर खान सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खान आणि करीनाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटाच्या चर्चा सुरु असताना करीना एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. करीनाने ‘केस तो बनता है’ या कॉमेडी शोमध्ये हजरी लावली होती. अभिनेता रितेश देशमुख या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामध्ये करीनाने केलेलं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – “अजूनही फिल्टर पाड्यातील चाळीतच राहतो कारण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं कसं आहे खरं आयुष्य?

करीनाचा ‘जब वी मेट’ चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या चित्रपटामध्ये तिने साकारलेलं पात्र तर प्रचंड गाजलं. इतकंच नव्हे तर या चित्रपटामध्ये तिने साकारलेली गीत या मुलीची भूमिका आणि तिचा रेल्वेमधील प्रवास अगदी गंमतीशीर होता. पण आपण साकारलेल्या गीत या भूमिकेमुळे भारतीय रेल्वेला फायदा झाला असल्याचं करीनाने या शोमध्ये म्हटलं आहे.

करीना म्हणाली, “जब वी मेट चित्रपटामध्ये मी गीत ही भूमिका साकारली. मी ही भूमिका साकारल्यानंतर भारतीय रेल्वेच्या कमाईमध्ये वाढ झाली.” करीनाने चित्रपटामधील या भूमिकेसाठी हेरम पँट परिधान केली होती. या पँटची विक्री माझ्यामुळेच वाढली असल्याचं करीनाने म्हटलं. अर्थात करीनाने हे गंमतीशीर पद्धतीने म्हटलं असलं तरी तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? अंकुश चौधरी म्हणाला, “अपघातात तिचं निधन झालं अन्…”

करीनाने यावेळी ‘जब वी मेट’मधील संवाद म्हणत उपस्थितांचं मनोरंजन केलं. रितेश देशमुखचा ‘केस तो बनता है’ देशातील पहिला कोर्ट कॉमेडी शो आहे, ज्यामध्ये रितेश सेलिब्रिटींवर आरोप करताना दिसत आहे. या शोमध्ये वरुण शर्मा सेलिब्रिटींचा बचाव करतो आणि कुशा कपिला जजच्या भूमिकेत आहे. करण जोहर, करीना कपूर, अनिल कपूर, रोहित शेट्टी, वरुण धवनपासून ते सारा अली खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होणार आहेत.