scorecardresearch

“सर्वकाही परफेक्ट असूनही…” सासरी घडणाऱ्या ‘या’ गोष्टीला त्रासली आहे करीना कपूर

करीना कपूर खानने सासरच्या कुटुंबीयांबाबत तक्रार केली आहे.

kareena kapoor khan, pataudi family, saif ali khan, soha ali khan, kunal khemu, pataudi family eid celebration, kareena kapoor isntagarm, करीना कपूर खान, सैफ अली खान, सोहा अली खान, कुणाल खेमू, पतौडी कुटुंबीयांचं ईद सेलिब्रेशन, करीना कपूर इन्स्टाग्राम
नुकतीच करीनानं तिच्या सासरच्या कुटुंबासोबत ईद साजरी केली.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत तिचे फोटो, वर्कआउट व्हिडीओ आणि तसेच कुटुंबीयांसोबतच्या गंमती जमती शेअर करत असते. नुकतीच करीनानं तिच्या सासरच्या कुटुंबासोबत ईद साजरी केली. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण यासोबतच तिनं सासरच्या कुटुंबीयांबाबत एक तक्रारही केली आहे.

करीना कपूर खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबत ईद सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटोचं कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. करीनानं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘त्या कुटुंबाकडून ईदच्या शुभेच्छा जी सर्वकाही परफेक्ट असतानाही कधीच एक परफेक्ट फोटो काढू शकत नाही.’ म्हणजे करीनाची तक्रार ही परफेक्ट फॅमिली फोटोबाबत आहे. तिच्या मते पतौडी कुटुंबीय कधीच एक परफेक्ट फॅमिली फोटो काढत नाही.

आणखी वाचा- राणादाने २ वर्षांपूर्वीच दिली होती पाठकबाईंसोबतच्या नात्याची कबुली? हार्दिक जोशीची पोस्ट चर्चेत

करिनानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्य तिच्यासोबत पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह, ननंद सोहा अली खान, कुणाल खेमू आणि त्यांची मुलगी इनाया दिसत आहेत. पण प्रत्येकजण स्वतःच्याच अंदाजात फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये करीनाच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नाहीये. करीनानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या फोटोच्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा- राज ठाकरेंच्या समर्थनाची पोस्ट प्राजक्ता माळीच्या अडचणी वाढवणार? रिपब्लिकन पार्टीने केली कारवाईची मागणी

करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kareena kapoor khan complain about pataudi family did not get the perfect picture mrj

ताज्या बातम्या