बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच तिच्या हटके लूकमूळे चर्चेत असते. मग तो चित्रपटांमधील लूक असो किंवा रँप वॉक करतानाचा लूक असो. करीनाची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. सध्या करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती या व्हिडीओमध्ये लॅक्मे इंडिया फॅशन वीकमध्ये रँप वॉक करताना दिसत आहे. पण तिचा रँप वॉक पाहून तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

लॅक्मे इंडिया फॅनश वीक हा इवेंट पार्किंगमध्ये ठेवण्यात आला होता. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये काही गाड्या उभ्या असल्याचे दिसत आहे. दरम्यान करीनाने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. तिचा हा ग्लॅमरस लूकमधील वॉक नेटकऱ्यांना आवडलेला दिसत नाही. त्यांनी करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका यूजरने ‘चैन से सोना है तो ये व्हिडीओ मत देखना, क्या है ये’ अशी कमेंट करत करीनाला ट्रोल केले आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने ‘असे वाटते ड्रेस खूप जास्त घट्ट आहे. बिचारीला नीट चालता देखील येत नाही’ असे म्हणत करीनाची खिल्ली उडवली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने पार्किंगमध्ये रँप वॉक का? असा प्रश्न विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर करीनाचा हा रँप वॉकचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.