scorecardresearch

हटके फॅशनच्या नादात करीना कपूर झाली ट्रोल, युजर्स म्हणाले…

आपल्या स्टाइलमुळे करीना कपूर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

kareena kapoor, kareena kapoor viral photo, kareena kapoor instagram, saif ali khan, kareena kapoor trolled, kareena kapoor age, kareena kapoor fashion, करीना कपूर, सैफ अली खान, करीना कपूर व्हायरल फोटो, करीना कपूर फॅशन, करीना कपूर ट्रोल
नुकतेच करीना कपूरचे काही फोटो समोर आले आहेत ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. फॅशनच्या बाबतीत तर करीना बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वात पुढे असते. अगदी तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळीही तिच्या फॅशनची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. मात्र काही वेळा तिला तिच्या हटके फॅशनसाठी ट्रोलही व्हावं लागलं आहे. आताही असंच काहीसं घडलंय. नुकतेच करीनाचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे.

करीना कपूरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये करिनानं लाल रंगाचा टँक टॉप आणि जीन्स घातलेली दिसत आहे. पण याच कपड्यांमुळे करीनाला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या करीनाचा हा कॅज्युअल लुक युजर्सना मात्र आवडलेला नाही. यामुळे अनेक युजर्सनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.

आणखी वाचा- Video : अन् ‘झुंड’मधील तो कलाकार थेट अमिताभ बच्चन यांना म्हणाला, ‘तुम्ही व्हा पुढे मी आलोच…’

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामुळे करीना ट्रोल केलं जातंय. तिच्या या फोटोंवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, ‘तुझी फॅशन आता खूपच वाईट होताना दिसत आहे.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘मला वाटतं तू आता तुझ्या स्टायलिस्टला कामावरून काढून टाकायला हवं.’

आणखी वाचा- Video : ‘किती हा अ‍ॅटीट्यूड…’ अजय देवगणच्या लेकीचं वागणं पाहून संतापले युजर्स

करीनाच्या फोटोवर कमेंट करताना आणखी एका युजरनं, ‘स्विमिंग सूट बदलायचं विसरलीस का?’ असा प्रश्न विचारला आहे. पण एका युजरनं तर चक्क करीनाला, ‘बॉडी बिल्डर दिसतेस’ असं म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. करीनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच आमिर खानसोबत ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2022 at 16:00 IST
ताज्या बातम्या