scorecardresearch

वयाच्या ६० व्या वर्षी सैफ करतोय बाबा होण्याचा विचार? करीना कपूर सक्त ताकीद देत म्हणाली…

सैफ अली खानला त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत.

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. करीना अनेकदा सैफ अली खानचे कौतुक करताना दिसते. त्यासोबतची ती तिच्या दोन मुलांसह सारा आणि इब्राहिमचीही विशेष काळजी घेताना दिसते. वयाच्या ६० व्या वर्षी बाबा होण्याचा विचार करणाऱ्या सैफला करीनाने एक सक्त ताकीद दिली आहे.

करीना आणि सैफ हा २०१२ सालामध्ये लग्नबंधनात अडकले होते. २०१६ साली करीनाने तैमूरला जन्म दिला होता. तर गेल्यावर्षी करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्यांनी त्याचे नाव ‘जहांगीर’ ठेवले आहे. सैफ अली खानला त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. सारा अली खान आणि जहांगीर यांच्यात २५ वर्षांचा फरक आहे.

नुकतंच एका मुलाखतीत करीनाला चारही मुलांसह सैफबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. Vogue या मासिकाशी बोलताना करीना म्हणाली, “सैफला प्रत्येक दशकात एक मूल झाले आहे. सैफला वयाच्या २० व्या, ३० व्या, ४० आणि ५० व्या वर्षीही मुले झाली आहेत. मात्र आता ६० व्या वर्षी ते होऊ नये, असे मी त्याला सांगितले आहे.”

“पण मला असे वाटतं की सैफसारखा आधुनिक विचारांचा माणूसच वेगवेगळ्या टप्प्यांवर चार मुलांचा बाप होऊ शकतो. तो त्याच्या चारही मुलांना पूर्ण वेळ देतो. सैफ सध्या जेहसोबत जास्त वेळ असतो. तो एक वडील म्हणून त्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. आम्ही आमच्यात एक करार केला आहे. जेव्हा तो एखाद्या चित्रपटाचे शूटींग करत असेल तेव्हा मी घरी राहणार आहे आणि त्या उलट जेव्हा मी शूटींग करत असेन तेव्हा तो घरी मुलांसोबत थांबेल”, असे करीनाने यादरम्यान सांगितले.

“कॉमेडियन सर्वत्र धोक्यात…”, विल स्मिथने क्रिसला कानशिलात लगावल्याच्या प्रकरणावर परेश रावल यांची पहिली प्रतिक्रिया

यावेळी करीना कपूरने तैमूर आणि सैफच्या बाँडिंगबद्दलही सांगितले. यावर ती म्हणाली की, “तैमूरला लोक फार आवडतात. जेव्हा घरी पाहुणे किंवा इतर मित्र परिवार असतो तेव्हा तो फार आनंदी असतो. तो लहान सैफ आहे. त्याला रॉकस्टार व्हायचे आहे. अब्बा हे माझे सर्वात चांगले मित्र असल्याचे तैमूर अनेकदा सांगतो.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kareena kapoor khan reveals she has warned her husband saif ali khan not to have another baby at 60s nrp

ताज्या बातम्या