“…म्हणून मी ट्विटरवर नाही”, बॉयकॉट ट्रेंडवर करीना कपूरने दिली प्रतिक्रिया

करीना कपूरने बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केले आहे.

“…म्हणून मी ट्विटरवर नाही”, बॉयकॉट ट्रेंडवर करीना कपूरने दिली प्रतिक्रिया
करीना कपूरनेबॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केले आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान आणि करीना कपूर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. आता करीना कपूरने यावर भाष्य केले आहे.

अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’, आमिर-करीनाचा ‘लाल सिंह चड्ढा’, आलिया भट्टचा ‘डार्लिंग्ज’ हे चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून गेले बरेच दिवस होत आहे. यावर आता करीना कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करीनाने बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केले आहे. करीना म्हणाली, “दरदिवशी सेलिब्रिटी ट्रोल होत असतात. त्यामुळे मी ट्विटरवर नाहीये. ज्यांना उगाच आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात, ते ट्विटरवर असतात. मला यावर वेळ वाया घालवायचा नाही. मी माझ्या मुलांसोबत, कुटुंबासोबत वेळ घालवते, त्यात मला आनंद मिळतो.

आणखी वाचा – रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, करीना कपूर म्हणाली, “मला हा अधिकार…”

‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. करीना चित्रपटाबद्दल म्हणाली, “जगात सगळ्यांनी ‘फॉरेस्ट गंप’ हा चित्रपट पाहिला नसेल. जे लोक इंग्रजी बोलत नाहीत ते या कथेसाठी नक्की चित्रपट पाहतील. हा चित्रपट तामिळ आणि तेलगूमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या भाषेत चित्रपट पाहता येईल.”

आणखी वाचा – आमिर खानची ‘ही’ सवय करीनाला होत नाही सहन, ‘कॉफी विथ करण ७’मध्ये केला खुलासा

अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचं अनुराग कश्यपनं केलं समर्थन, कारण देत म्हणाला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी