ट्रोल झाल्यानंतर अखेर करीना कपूरने सबा अली खानच्या पोस्टवर दिली प्रतिक्रिया

“तुझ्या एकाही पोस्टला करीना कपूर उत्तरही देत नाही” अशी कमेंट करत नेटकऱ्यांनी सबाला ट्रोल केलं होतं.

kareena-kapoor-saba-ali-khan (1)

अभिनेता सैफ अली खानची बहीण सभा अली खान पतोडी सोशल मीडियावर कायम आपल्या कुटुंबीयांसोबत फोटो शेअर करत असते. सबा अनेकदा सैफ अली खानचा मुलगा तैमूर आणि सोहा अली खानची मुलगी इनाया यांच्यासोबतचे देखील क्यूट फोटो शेअर करत असते. सबाने शेअर केलेले तैमूर आणि इनायाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका नेटकऱ्याने कमेंट करत सबा अली खानला ट्रोल केलं होतं. “तुझ्या एकाही पोस्टला करीना कपूर उत्तरही देत नाही” अशी कमेंट युजरने केली होती. या नेटकऱ्याला सबाने उत्तरही दिलं होतं. “माझं माझ्या वहिनी वर प्रेम आहे” असं ती कमेंटमध्ये म्हणाली होती.

आता या युजरला करीना कपूरने देखील तिच्या इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे याला कॅप्शन दिलं नसलं तरी इमोजीच्या माध्यमातून तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

kareena-kapoor-post
(Photo-instagarm@kareenakapoorkhan)

हे देखील वाचा: ‘कपिल शर्मा’ शो पाहण्यासाठी विराट कोहलीला मोजावे लागले होते ३ लाख रुपये!

सबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तैमूरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तैमूरने निळ्या रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट परिधान केल्याच दिसतंय. नेहमीप्रमाणेच तो या फोटोत क्यूट दिसतोय. तर तैमूरने परिधान केलेले कपडे हे त्याला त्याची आत्या म्हणजेच सबाने गिफ्ट केले आहेत. हा फोटो शेअर करत सबा कॅप्शन मध्ये म्हणाली आहे, “माय जान टीम.. तू जो निळा शर्ट परिधान केला आहेस तो तुला तुझ्या आत्याने गिफ्ट अर्थातच मी गिफ्ट केला आहे. मला मुलांना बिघडवायला आवडतं आणि लहान मुलांना नवे कपडे घालायला आवडतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba (@sabapataudi)

सबाने शेअर केलेला हा फोटो करीना कपूरने तिच्या इस्टास्टोरीला शेअक केलाय. तिने कोणतही कॅप्शन दिलं नसलं तरी तीन हार्ट ईमोजी दिले आहेत आणि तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावरुनच करीना आणि नणंद सबा यांच्यामध्ये प्रेमाचं नातं असल्याचं लक्षात येत आहे.

सैफ अली खानची बहीण सभा बॉलिवूड आणि ग्लॅमरस दुनियेपासून दूर आहे. असं असलं तरी ते करीना कपूर, भाऊ सैफ तसेच बहीण सोहा अली खान सोबत अनेक फोटो शेअर करत असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kareena kapoor replies saba ali khan on sharing taimur photo after saba get trolled kpw

ताज्या बातम्या