scorecardresearch

नजर लागणे खरे असते, तर करिना रुग्णालयात असती

छोट्या नवाबाचा किस्सा शेअर करताना सैफने केले करिनाच्या सौंदर्याचे कौतुक

नजर लागणे खरे असते, तर करिना रुग्णालयात असती
अभिनेत्री करिना कपूर

‘माझा मुलगाच सर्वात सुंदर’ आहे असे म्हणणाऱ्या करिनाच्या सौंदर्याचे सैफने अनोख्या अंदाजात कौतुक केले आहे. करिना आणि सैफ यांच्या छोट्या नवाबाची अर्थात तैमुरच्या नावाची काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. तैमुरच्या जन्मानंतर सोशल मीडियावर ज्याप्रमाणे त्याच्याच विषयीच्या विविध चर्चांना उधाण आले होते. अगदी तसेच त्याचा एक फोटो देखील व्हायरल झाले होते. सैफ अली खानने तैमुरचा फोटो व्हॉटसऍप डीपी ठेवल्यानंतर त्याचा फोटो व्हायरला झाला होता. या व्हायरल झालेल्या फोटोबद्दल सैफने एका मुलाखतीमध्ये एक वेगळा किस्सा सांगितला.

सैफ अली खान तैमुरच्या व्हॉटसऍप डिपीसंदर्भात म्हणाला की, तैमुरचा फोटो व्हॉटसअप डिपी ठेवल्याचे करिनाला बिलकूल रुचले नव्हते. आपल्या बाळाला कोणाची तरी नजर लागेल, असे तिला वाटत होते. पण माझा अशा गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे मी तिच्या या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. नजर लागणे हा प्रकार असता तर करिना रुग्णालयात असती, असे सांगत त्याने अप्रत्यक्षपणे करिनाच्या सौंदर्याचे कौतुक केले. तैमुर नावाच्या चर्चेवर सैफ म्हणाला की, तो आताच खूप लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे त्याला जमिनीवर राहायला शिकवावे लागेल.
दरम्यान, तैमुरच्या नावाची रंगलेली चर्चाही विचित्र वाटल्याचे करिनाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनेवर उमटलेल्या प्रतिक्रियेवर तिने नाराजी व्यक्त केली. लोकांनी तैमुरच्या नावाचा एवढा गाजावाजा का केला? हे समजू शकलेली नाही. दरम्यान तिने पती सैफच्या सूरात सूर मिळवत आपल्या चिमुकल्या बाळाच्या नावाचे स्पष्टीकरण दिले होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये तैमुरवरुन कोणाचीच नजर हटणार नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. निळ्या डोळ्यांमधून पाहायला मिळणारी तैमुरची निरागसता अनेकांनाच भुरळ घालत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या आयुष्यात एका चिमुकल्याचे आगमन झाले. सैफिनाच्या बाळाचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूडकरांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्षात करिनाची भेट घेत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. बाळाच्या जन्मानंतर करिना आणि सैफने त्यांच्या बाळाचे नाव तैमुर ठेवले. सध्या कपूर कुटुंबातच नाही, तर बॉलिवूड विश्वात आणि सर्वच चाहत्यांमध्येही तैमुरविषयीच्याच चर्चा रंगत आहेत. सैफच्या या छोट्या नवाबाची पहिली झलक जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हाही चाहत्यांनी तैमुरच्या फोटोला पसंती दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2017 at 20:03 IST

संबंधित बातम्या