बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच करीनाने एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटो पेक्षा बॉलिवूडची क्वीन कंगनाच्या कमेंट चर्चेत आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सैफ आणि तैमूर दिसत आहेत. तैमूर चित्र काढताना दिसते. सैफने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पायजमा परिधान केला आहे. तर तैमूरने निळ्या रंगाचा नाईट ड्रेस परिधान केला आहे. करीनाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. करीनाच्या या पोस्टवर कंगनाने सुंदर अशी कमेंट केली आहे. कंगनाची ही कमेंट पाहिल्यानंतर आता नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.
आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!
कंगनाच्या कमेंटवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘हे काय पाहिलं मी.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला तर चक्कर आली.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मला सुद्धा चक्कर आली.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘असं वाटतयं की गेल्या काही दिवसांपासून हिला कोणता नवीन मुद्दा मिळाला नाही..म्हणून काही दिवसांपासून मस्का लावण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशा अनेक कमेंट
आणखी वाचा : ‘माझी परफेक्ट वाईफ’, रितेशने शेअर केला जिनिलियाचा हा मजेशीर व्हिडीओ
आणखी वाचा : ४६ वर्षांच्या सुष्मिता सेनच्या एकूण संपत्ती विषयी माहिती आहे का?
दरम्यान, करीना लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. कंगना सध्या ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट तिच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. या चित्रपाटत नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत. कंगनानं नुकतेच या शूटिंगचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यात ती डायरेक्टरच्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे. याशिवाय आगामी काळात कंगना ‘धाकड’, ‘तेजस’ आणि ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.