करिना कपूरने केवळ एका जाहिरातीच्या शूटसाठी परिधान केला लाखो रूपयांचा सूट

करिना कपूरने केवळ एका जाहिरातीसाठी इतका महागडा अनारकली सूट घातला होता, ज्याची किंमत ऐकून आश्चर्यचकितच व्हाल…

kareena-kapoor-khan-759-leadfb
(Photo: Indian Express Archive)

करिना कपूर एक अशी अभिनेत्री आहे, जिने स्वतःच्या हिंमतीवर मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला व कष्ट करून मोठं यश देखील मिळवलं. अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी करिना इंडस्ट्रीमध्ये टॉपची अभिनेत्री म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. अलिकडेच या सुंदर अभिनेत्रीने अभिनेता अनिक कपूरसोबत एका जाहिरातीसाठी शूटिंग केलं. सोशल मीडियावर याचे काही फोटोज समोर आल्यानंतर फोटोमधील करिनाने परिधान केलेल्या अनारकली सूटची बरीच चर्चा सुरूय. याला कारणही तसंच आहे.

अभिनेत्री करिना कपूरने आज अभिनेता अनिल कपूरसोबत एका जाहिरातीसाठी मुंबईत शूटिंग केलं. या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान ते दोघे एकत्र दिसून आले. शूटिंगदरम्यानचे काही फोटोज करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही पारंपारिक वेशभूषेत दिसून येत आहेत. पण फोटोमधील बेबो मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. पिवळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसून येत होती. या फोटोमध्ये तिने अभिनेता अनिल कपूरच्या खांद्यावर हात ठेवताना पोज देताना दिसून आली. करिनाने हे फोटोज शेअर केल्यानंतर तिने परिधान केलेल्या अनारकली सूटबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगू लागली आहे. जाहिरातीच्या शूटसाठी करिनाने डिजाइनर रिधि मेहरा यांनी तयार केलेल्या अनारकली सूटची निवड केली. अनारकली सूटवर फ्लेअर्ड पॅन्ट आणि एक कढ़ाईदार नेटची ओढणी, चोकर नेकलेस, मॅचिंग ईअररिंग्स आणि हेवी मेकअप, मॅट लिप शेड, स्मोकी आय शॅडो, स्लीक विंग्ड आयलाइनर या सर्व गोष्टींमुले तिच्या या पारंपारिक अंदाज झळकून येत होता.

या ड्रेसमधील तिचा लुक इतका जबरदस्त होता की कोणीही तिच्याकडे एकटक पाहतच राहील. दरम्यान हा लुक कॉपी करणं तिच्या महिला चाहत्यांसाठी कठीण ठरू शकतं. कारण करिनाच्या या सूटची किंमत १ लाख ४८ हजार रूपये इतकी आहे.

अभिनेता अनिल कपूरबाबत सांगायचं झालं तर करिनाच्या अनारकली सूटला मॅच करेल असा सफेद कढ़ाईवाली शेरवानी आणि त्याला मॅचिंग पॅन्ट तसंच काळ्या रंगाचे बूट परिधान करून बरोबरीची टक्कर दिली होती. करिनाने पहिल्यांदाच अनिल कपूरसोबत स्क्रिन केलेली नाही. यापूर्वी तिने अनिल कपूरसोबत ‘टशन’ आणि ‘बेवफा’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kareena kapoor shoots with anil kapoor in an anarkali suit worth rs 1 lakh prp

ताज्या बातम्या