आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा येत्या रक्षाबंधनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिर आणि करीना सध्या दोघही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. लवकरच दोघ करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण सिझन ७’मध्ये हजेरी लावणार आहेत. या नव्या एपिसोडचा प्रोमो कऱणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात दोघांनी करणसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी शोमध्ये करीनाने आमिरच्या एका सवयीचा खुलासा केला. शिवाय आमिरच्या या सवयीचा त्रास होत असल्याचंही ती म्हणाली.

या प्रोमोमध्ये आमिरने करीनाला एक प्रश्न विचारला आहे. “माझी अशी कोणती गोष्ट तुला खटकते किंवा सहन करावी लागते.” असं आमिरने करीनाला विचारलं. यावर करीना म्हणाली “तू सिनेमा पूर्ण करण्यासाठी दोनशे तीनशे दिवस घेतो, अक्षय कुमार मात्र ३० दिवसात पूर्ण करतो.” करीनाच्या उत्तरावर आमिरने आश्चर्य व्यक्त केलं.

हे देखील वाचा: “संपूर्ण शोमध्ये माझा अपमान…” Koffee with Karan 7 बद्दल असं का म्हणाला आमिर खान?

आमिर खान आणि करीना या प्रोमोमध्ये धमाल करताना दिसत आहेत. तसचं करणने करीनाला सेक्स लाईफ बद्दलही प्रश्न विचारला आहे. यावर करिनाने करणच्या कोर्टातच उलटा चेंडू फेकल्याचं दिसतंय. मुलं झाल्यानंतर सेक्स लाइफमध्ये काही बदल होतात का? असा प्रश्न करणने करीनाला विचारला. यावर करिनाने “याचं उत्तर तुला माहित नाही का?” असा प्रतिप्रश्न करणला विचारला. यावेळी हा शो माझी आई देखील पाहते असं करण म्हणताना दिसतोय.

हे देखील वाचा: Video : …अन् ‘त्या’ महिलेने विमानतळावरच अक्षय कुमारला केलं किस, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

दरम्यान करीनानंतर आमिर खानने देखील करणच्या प्रश्नावर त्याचीच फिरकी घेतली. “जेव्हा तू इतरांच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारतोस तेव्हा तुझी आई शो बघत नाही का?” असा सवाल आमिरने करणला केल्याचं प्रोमोत पाहायला मिळतंय. एकूण आमिर आणि करीना सोबतच्या हा खास भाग धमाकेदार असणार हे प्रोमो पाहून लक्षात येतंय. ४ ऑगस्टला हा खास भाग प्रसारित होणार आहे.