आलिया भट्टदेखील कपूर कुटुंबाचीच सदस्य?; करिश्मा कपूरने तोंडावर ठेवला हात अन्…

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये करिश्मा पाहुणी कलाकार म्हणून आली होती. शोमधील तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Karisma Kapoor, Alia Bhatt, Ranbir Kapoor, Super Dancer 4, Anurag Basu,
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये पाहुणी कलाकार म्हणून आली होती. शोमध्ये स्पर्धकांचा डान्स पाहून करिश्माने त्यांची प्रशंसा केली आहे. दरम्यान एका छोट्या स्पर्धकाने करिश्माला काही प्रश्न विचारले. त्यावर करिश्मा उत्तर देत असताना परीक्षक अनुराग बासूने अभिनेत्री आलिया भट्ट विषयी असे काही म्हटले की ते ऐकून करिश्माची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

कपूर कुटुंबीय हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कुटुंब आहे. करिश्माच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे अभिनेते आहेत. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते राज कपूर, ऋषि कपूर, करीना कपूर, रणबीर कपूर, शमि कपूर आणि इतर सदस्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आणखी वाचा : अमृता आणि सैफच्या घटस्फोटावर सारा अली खानची प्रतिक्रिया, म्हणाली ‘हे खूप…’

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये एका स्पर्धकाने करिश्मा कपूरला ‘तुझ्या कुटुंबामध्ये एकूण किती अॅक्टर्स आहेत?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने उत्तर देत, ‘इतके आहेत की मोजणं देखील कठीण आहे’ असे म्हटले. त्यानंतर करिश्माने पृथ्वीराज कपूर यांच्यापासून नावे घेण्यास सुरुवात केली. दरम्यान शोचा परीक्षक अनुराग बासूने आलिया भट्टचे नाव देखील घेतले. ते ऐकून करिश्माने तोंडावर हात ठेवला आणि यावर बोलणे टाळले.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच ते लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण त्या दोघांनीही यावर वक्तव्य केलेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karisma kapoor at a loss for words at suggestion that alia bhatt should be counted as kapoor avb