scorecardresearch

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

या फोटोमधील लहान मुलगी स्वतः आता एक सुपरहिट अभिनेत्री आहे. तिचे वडील हिंदी सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीचा लहानपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रत्येक जण या फोटोतील लहान मुलगी नक्की कोण अभिनेत्री आहे, याचा अंदाज लावताना दिसून येत आहेत. हा फोटो अगदी झूम करून पाहिला तरी चेहरा ओळखणं प्रेक्षकांसाठी अवघड बनलंय. या फोटोमधील लहान मुलगी स्वतः आता एक सुपरहिट अभिनेत्री आहे. तिचे वडील हिंदी सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.

फोटोमध्ये दिसणारी ही लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही, तर 1990 ते 2000 चं दशक गाजवणारी बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लहानपणीचा हा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये करिश्माने तिच्या हातात हॅंडबॅग दिसून येतेय. ही हॅंडबॅग एका घराप्रमाणे दिसून येतेय. घराप्रमाणे दिसणारी हॅंडबॅग पडकून तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसून आला. करिश्मा कपूरने हा फोटो #throwbackthursday हा हॅशटॅग वापरून शेअर केलाय.

करिश्मा कपूरने तिच्या लहानपणीचा हा फोटो शेअर केल्यानंतर तिच्या फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. या फोटोमधला तिचा क्यूट लुक फॅन्सच्या पसंतीस पडलाय. फक्त फॅन्सच नव्हे तर सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या या क्यूट फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. करिश्माची मैत्रिण मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि तिची चुलत बहिण रिद्धिमा कपूर साहनी यांनी तिचा हा फोटो शेअर केलाय. मलायका आणि रिद्धिमाने हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृताने ‘सो क्यूट’ अशी कमेंट केली आहे.

करिनासोबत शूटिंगमध्ये व्यस्त आहे करिश्मा

करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती करिना कपूरसोबत शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या सोशल मीडियावर शूटिंगच्या सेटवरचा फोटो शेअर केला होता. ‘बेबो सोबत शूटिंग करताना नेहमीच मजा येते’ असं देखील तिने या फोटोसोबत लिहिलंय.

करिश्मा कपूर ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ठरलीय. तिने ‘हीरो नंबर’, ‘राजा बाबू’ सारख्या सुपरहीट चित्रपटात काम केलंय. तसंच गोविंदासोबत करिश्माची जोडी सिल्वर स्क्रीनवर खूपच पसंती मिळाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-07-2021 at 16:32 IST

संबंधित बातम्या