…म्हणून कार्तिकने बहिणीसोबतचा तो व्हिडीओ केला डिलीट

जाणून घ्या कारण

सतत चित्रीकरणामध्ये व्यग्र असलेले कलाकार सध्या लॉकडाउनमुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. ते आपल्या कुटुंबीयांसोबत व्हिडीओ करुन सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अशातच अभिनेता कार्तिक आर्यनचा बहिणीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण ट्रोल झाल्यानंतर त्याने तो व्हिडीओ डिलिट केला आहे.

कार्तिकने त्याच्या बहिणीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये कार्तिक बहिणीने बनवलेली पोळी खाताना दिसत आहे. पण पोळी खाल्यानंतर तिची चव इतकी चांगली नसल्याचे कार्तिकला जाणवते. तो जातो आणि बहिणीला ओरडतो. त्यानंतर तिला बाल्कनीमधून बाहेर फेकल्याचा अभिनय करतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर कमेंट केल्या. तसेच कार्तिकला त्यासाठी ट्रोलही करण्यात आले. ट्रोल झाल्यानंतर कार्तिकने लगेच तो व्हिडीओ सोशल मीडियावरुन डिलिट केला आहे.

या व्हिडीओमध्ये त्याने बहिणीचे केस पकडल्याने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप अनेकांनी केला. तसेच एका युजरने चित्रपटात अशा भूमिका साकारणे ही वेगळी गोष्ट आहे आणि भाई तू स्वत: अशी स्क्रिप्ट लिहितोयस असे एका युजरने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kartik aaryan deletes his controversial misogynist video featuring his sister avb

ताज्या बातम्या