मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स पुन्हा एकदा सुरु करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळाले. पण काही निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिला. या यादीमध्ये ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

‘भूल भुलैया २’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २५ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कार्तिकने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.

pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
banned films because of bold scenes
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
nilesh sable recalls meeting raj thackeray
निलेश साबळेने सांगितला राज ठाकरेंच्या घरी घडलेला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर…”

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमधील कार्तिकचा लूक सध्या चर्चेत आहे. त्याने काळा चष्मा लावला आहे, हातात माळ घेतली आहे आणि हटके टी-शर्ट परिधान केला आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘२५ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

‘भूल भुलैया २’ हा २००७मध्ये प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट भूल भलैयाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी आहूजा हे मुख्य भूमिकेत दिसले होते. आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मूख्य भूमिकेत दिसणार आहेत.