‘धमाका’ करण्यासाठी कार्तिक आर्यन सज्ज, सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज

धमाका’ सिनेमा १९ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री अमृता सुभाष देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

dhamaka-trailer

कार्तिक आर्यनच्या ‘धमका’ या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात खऱ्या अर्थाने ‘धमाका’ पाहायला मिळणार हे ट्रेलरवरून लक्षात येत आहे. सिनेमात कार्तिक एक न्यूज अँकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मुंबईत झालेला बॉम्ब स्फोट आणि त्यानंतर कार्तिक आर्यनचं हादरुन गेलेलं आयुष्य पाहायला मिळतंय.

सिनेमाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. सिनेमात कार्तिक आर्यन अर्जुन पाठक नावाची भूमिका साकारतोय. एका फोन कॉलने त्याच्या आयुष्यात काही तासात आलेलं वादळ पाहायला मिळतंय. रघुवीर नावाचा एक व्यक्त फोन करून त्याला सीलिंक उडवण्याची माहिती देतो आणि दुसऱ्या सेकंदाला तसं घडतही. यानंतर कार्तिक चॅनलला फोन करणाऱ्या या व्यक्तीची मुलखात लाइव्ह करण्याचा सल्ला देतो. या एका मुलाखती दरम्यानच एकीकडे मुंबईत धमाके होत असतानाच कार्तिकच्या आयुष्यात एक एक धमाके होत असल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री मृणाल ठाकूर या सिनेमात कार्तिकच्या पत्नीची आणि एका पत्रकाराची भूमिका साकारतेय. यात तिचं आयुष्यदेखील धोक्यात असल्याचं पाहायला मिळतंय.

‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री , अजय देवगणच्या ‘या’ सिनेमातून करणार पदार्पण

तरुणाने अमिताभ बच्चन यांना दाखवून दिली चूक, बिग बींनी माफितली माफी

‘धमाका’ सिनेमा १९ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री अमृता सुभाष देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कार्तिक पहिल्यांदा कॉमेडी आणि रोमॅण्टिक भूमिका न साकारता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची खासबात म्हणजे कार्तिकने अवघ्या १० दिवसांमध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. लॉकडाउन दरम्यान या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kartik aryan dhamaka trailer out wil release on netflix kpw