Video : जिंदगी का सफर! पाहा, कार्तिकी-रोनितचा लग्नसोहळा

हळदीपासून रिसेप्शनपर्यंत… असा रंगला कार्तिकीचा लग्नसोहळा; पाहा व्हिडीओ

‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड आणि व्यावसायिक रोनित पिसे यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. खरं तर आता त्यांचं लग्न होऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही तिच्या लग्नाच्या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाही. लॉकडाउनच्या काळातही कार्तिकी व रोनितचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. त्यांमुळे त्यांच्या लग्नाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतूर आहेत. यात सध्या कार्तिकी व रोनितच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसोहळ्यातील मोजके पण महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत.

सध्या सोशल मीडियावर कार्तिकी आणि रोनितच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील जिंदगी का सफर.. अब तेरे साथ में हे गाणं कार्तिकीने स्वत: गायलं असून तिच्या भावाने कौस्तुभ गायकवाडने तिला साथ दिली आहे. या व्हिडीओमध्ये हळदी समारंभापासून ते अंतरपाट आणि सप्तपदींपर्यंत सगळे विधी सुंदररित्या दाखवण्यात आले आहेत.


सध्या कार्तिकीच्या लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत असून त्याला ७४ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्यासोबतच व्हिडीओतील गाणं प्रेक्षकांना विशेष भावत आहे. हे गाणं कौस्तुभने स्वत:च संगीतबद्धदेखील केलं आहे.

पाहा : सहकुटुंब सहपरिवार! कार्तिकी गायकवाडचं सासर-माहेर एकाच ‘फ्रेम’मध्ये

दरम्यान, कार्तिकी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आहे तर तिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनिअर आहे. २६ जुलै २०२० रोजी या दोघांचा साखरपुडा झाला त्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kartiki gaikwad wedding video goes viral sang by her ssj

ताज्या बातम्या