बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या ही जोडी चर्चेत आले. त्यातच आता नेहाने तिचा पहिला करवाचौथ सेलिब्रेट केला असून त्याचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेहाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रोहनप्रीतसोबत डान्स करताना दिसत आहे. मेहंदी दा रंग या गाण्यावर या दोघांनी ताल धरला असून त्यांच्यातील प्रेम दिसून येत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर पहिलाच करवाचौथ असल्यामुळे नेहाच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.
View this post on Instagram
#MehendiDaRang @rohanpreetsingh @itsjassilohka @rana_sotal Love This Song! #NehuPreet
दरम्यान, नेहाच्या लग्नातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. यात तिने परिधान केलेले दाग-दागिने आणि कपड्यांची विशेष चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.