‘मी प्रयत्न करतोय पण गोष्टी हाताबाहेर जात आहेत’, ‘कसौटी जिंदगी की’ अभिनेता करतोय नैराश्याचा सामना

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने व्यक्त केली खंत..

sahil anand
'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटात साहिलने महत्वाची भूमिक साकारली होती.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी पुढे येऊन मानसिक आरोग्याविषयी चर्चा केली. काहींनी त्यांचा हा प्रवास कसा होता हे सोशल मीडियावर सांगितले. तर कोणी कोणत्या याचा कसा सामना केला हे सांगितलं. आता असचं काही तरी अभिनेता साहिल आनंदसोबत झाले आहे. साहिल हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

साहिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये साहिलने एक मेसेज त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. “सर्वांना नमस्कार, तुम्ही सगळे सुखरूप असाल अशी आशा करतो. मी काही दिवस सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून जेव्हा मी तुमच्या पासून लांब असेल तेव्हा तुम्ही तुमची काळजी घ्या, गेले काही महिने माझ्यासाठी कठीण होते. काही दिवसांपासून मी कुठे तरी हरवलो आहे असे मला वाटतं आहे. मला आता शांततेची गरज आहे,” असे साहिल म्हणाला.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Sahil Anand (@sahilanandofficial)

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

पुढे साहिल म्हणाला, “मित्रांनो, मानसिक आरोग्य महत्वाचे आहे, कधी कधी ज्या गोष्टींना आपण जवळ करतो त्यांच गोष्टींचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्यावर होतो. तरीही मी प्रयत्न करतोय पण गोष्टी हाताबाहेर जात आहेत. सगळ्यांनी काळजी घ्या.”

आणखी वाचा : ‘फोटोग्राफर आमिर खान असेल’, बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे फातिमा झाली ट्रोल

साहिलचे लाखो चाहते आहेत. साहिलने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम केले आहे. ‘है अपना दिल तो आवारा’, ‘बिग बॉस’ आणि ‘कसोटी जिंदगी की’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kasautii zindagii kay actor sahil anand s latest post gets worried fan as he says last couple months have been tough dcp

ताज्या बातम्या