थाटामाटात लग्न करण्यापूर्वी विकी-कतरिना करणार कोर्ट मॅरेज?

कतरिनासोबत लग्नासाठी विकी हा फार उतावळा झाला आहे.

katrina kaif, vicky kaushal, katrina kaif and vicky kaushal honeymoon,
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमध्ये हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या लग्नासाठी दोघांचे चाहते फार उत्सुक आहेत. पण अद्याप त्या दोघांनीही लग्नाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाची सर्व तयारी गुपचूप करत असल्याचे बोललं जात आहे. कतरिनासोबत लग्नासाठी विकी हा फार उतावळा झाला आहे. त्यामुळे फार जास्त वेळ न घालवता पुढच्या आठवड्यात ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

एका वृत्तानुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचेही बोललं जात आहे. या दोघांच्या लग्नाचा संपूर्ण सोहळा आठवडाभर रंगणार आहे. येत्या १ डिसेंबर ते ७ डिसेंबरमध्ये ते दोघेही लग्न करतील असे म्हटलं जात आहे. या दोघांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित करण्यात आला आहे. त्या दोघांचा विवाह अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने होणार असल्याचेही बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम याची चाचपणी सध्या करत आहे.

हेही वाचा : रणवीर सिंग करतोय ‘देवमाणूस २’ मालिकेचे प्रोमोशन? पाहा व्हिडीओ

कतरिना आणि विकीच्या लग्नाची संपूर्ण तयारी एक इवेंट कंपनी करत आहे. सध्या त्यांची टीम लग्नात होणाऱ्या प्रत्येक छोट्या विधींच्या तयारीत व्यस्त आहे. विकी घोड्यावर बसून कुठून येणार, मेहंदी कोण लावणार, थीम कोणती असणार, याचा संपूर्ण तयारी सध्या जोरात सुरु आहे. या लग्नासाठी कतरिनाचा लेहेंगा हा लोकप्रिय फॅशन डिझायनर सब्यासाची डिझाइन करत असल्याचे बोललं जात आहे. कतरिना आणि विकी दोघेही त्यांच्या लग्नाचे कपडे फायनल करत आहेत. तर दुसरीकडे या दोघांचे पालक हे राजस्थानमध्ये लग्नाची तयारी करण्यात व्यस्त असल्याचे बोललं जात आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif and vicky kaushal court marriage before week their wedding said sources nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या