विकी कौशल आणि कतरिना कैफच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम, सत्य आलं समोर

विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाला असून रोकादेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

vickey-kaushal-katrina-kaif
(File Photo)

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाला असून रोकादेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला होता. यावर आता विकी आणि कतरिनाच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून विकी आणि कतरिना एकमेकांनी डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलंय. असं असलं तरी दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. यातच विकी आणि कतरिनाने साखरपुडा केला असून त्यांचा रोकादेखील झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र सध्या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पसरलं आहे.

हे देखील वाचा: कंगना रणौतने स्वीकारली होती अडल्ट सिनेमाची ऑफर; ‘ते’ कपडे परिधान करून केलं होतं फोटोशूट

विकी आणि कतरिनाचा रोका झालेला नाही हे आता स्पष्ट झालंय. झूमशीबोलताना कतरिनाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. “कोणताही रोका झालेला नसून कतरिना लवकरच टायगर 3 च्या शूटसाठी रवाना होत आहे.” अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे विकी आणि कतरिनाचा साखपुडा झाल्याच्या केवळ अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhand Gyan (@jhandgyans)

हे देखील वाचा: “इथे काही लोक तुमच्याकडून अशी कामं करून घेतील जी…”, रिचा चड्ढाने केला बॉलिवूडचा पर्दाफाश

सोशल मीडियावर विकी कौशल आणि कतरिनाचा एक जुना फोटो चांगलाच व्हायरल होवू लागला होता. या फोटोत कतरिनाने लाल लेहंगा परिधान केल्याचं दिसतंय. तर विकी कौशलने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. या फोटोमुळे कतरिना आणि विकीचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र हा फोटो २०१९ सालातील असून अनिल कपूरने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीचा आहे.

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिना डेट करत असल्याचं म्हंटलं होतं. यावर कतरिनाच्या टीममधील एका व्यक्तीने झूमशी बोलताना खुलासा केलाय. “”विकी आणि कतरिना एकत्र आहेत, हे खरे आहे. कदाचित हे सांगितल्यामुळे माझ्या अडचणी वाढू शकतात? मात्र त्यांचं नातं आता बऱ्यापैकी उघड आहे.” असं ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif and vicky kaushal engagement team clarified the rumours are false kpw

ताज्या बातम्या