लग्नानंतर कतरिना आणि विकी हनीमूनला जाणार नाही?

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमध्ये हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

katrina kaif, vicky kaushal, katrina kaif and vicky kaushal honeymoon,
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमध्ये हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता ते दोघे लग्नानंतर हनीमूनला जाणार नाही अशा चर्चा सुरु आहेत.

सध्या कतरिना तिच्या प्रोजेक्टची सगळी काम लवकरात लवकर संपव्याचा प्रयत्न करत आहे. तर कतरिना अजून कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली नाही. एवढंच काय तर करिनाच्या लग्नासाठी सलमानने टायगर ३ च्या चित्रीकरणाच्या तारिखा पुढे ढकलल्या आहेत.

आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार कतरिना आणि विकी लग्नानंतर हनिमून ब्रेकला जाणार नाहीत. कारण, दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. यामुळे दोघेही हनिमूनला जाणार नाहीत. दोघांच्याही हातात सध्या नवे प्रोजेक्ट आहेत. दोघेही चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”; अभिनेत्रीने संतापून पत्रकारालाचा विचारला हा विचित्र प्रश्न

दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif and vicky kaushal wedding say what the couple is going to skip the honeymoon dcp