‘कौन बनेगा करोडपती १३’च्या यावेळीच्या शानदार शुक्रवारच्या खास एपिसोडमध्ये ‘सूर्यवंशी’ सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार, कतरिना कैफसह रोहित शेट्टीने हजेरी लावली आहे. या खास एपिसोडचे प्रोमो सोनी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या एपिसोडमध्ये कतरिना आणि अक्षय हॉटसीटवर बसून गेम खेळताना दिसतील . तर कतरिनाने बिग बींच्या स्टाईलमध्ये डायलॉगबाजी करत बिग बींना थक्क केल्याचं या आधीच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. यानंतर शोचा आणखी एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या प्रोमोत कतरिनाने बिग बींना एक असा प्रश्न विचारल्याचं दिसतंय ज्यामुळे त्यांची बोलतीच बंद झाली. कतरिनाने शोमध्ये येण्यासाठी तयारी केल्याचं सांगितलं. यासाठी तिने काही इतिहासाचे धडे आणि गुगुलवर माहिती सर्च करून तयारी केल्याचं सांगितलं. मात्र पुढे तिने असा प्रश्न विचारला की बिग बी निशब्द झाले तर अक्षयला मात्र हसू आवरणं कठीण झालं.

Birthday Special: न्यूड फोटोशूट ते २५ वर्ष लहान मुलीशी लग्न, ‘या’ कारणांमुळे मिलिंद सोमण कायम चर्चेत

“एक लाइफ लाईन एखदाच वापरू शकतो की प्रत्येक प्रश्नाला” असा गजब प्रश्न कतरिनाने बिग बींना विचारला. यावर नेमकं काय उत्तर द्यावं हेच बिग बींना सुचलं नाही. तर “तर आजवर तुम्हाला असा प्रश्न कुणी विचारला नसेल” असं अक्षय म्हणाला. शोचा हा धमाल प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

करीना कपूरने शेअर केला सैफ आणि जेहचा क्यूट फोटो, नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष

या आधीच्या प्रोमोत कतरिनाने बिग बींच्या अंदाजात त्यांचा ‘विजय दिनानाथ चौहान नाम तो सुना ही होगा’ डायलॉग म्हणताना दिसली होती. यावर बिग बींनी तिचं कौतुक केलं होतं. “मॅडम पोटावर पाय दिला” असं ते म्हणाले होते.