हा आहे कतरिनाचा बर्थडे प्लॅन

बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ.

katrina kaif
कतरिना कैफ

बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या अभिनयकौशल्याने आणि नृत्यकौशल्याने तिने प्रेक्षकांची मतं जिंकली आहेत. बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले. ‘बूम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. कतरिना सध्या मेक्सिको मध्ये आहे. तिथेच ती तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. ‘डी.एन.ए’ ला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, “मी या दिवशी खूप मज्जा करते. खरं सांगायचं झालं तर, ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. काही दिवस सुट्टी घेऊन तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत मज्जा करण्याचा हा दिवस असतो.”

कतरिनासाठी वाढदिवस म्हणजे एखाद्या छान ठिकाणी जाऊन आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणे. तिचा हा वाढदिवस सुद्धा ती असाच साजरा करणार आहे. समाजमाध्यमं आणि ग्लॅमरविश्व दोन्हीचं दडपण घेऊन वावरणं तिला अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच या दोन्ही गोष्टींपासून ती अंतर राखून आहे. तिला चित्रपटांव्यतिरिक्त इतर वेळी इतरांसारखंच साधं राहावंसं वाटतं.

“मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला, त्यांच्यात रमायला आवडतं. तेव्हा तर मला अगदी साधे कपडे घालून फिरायचीही इच्छा असते. मात्र हल्ली समाजमाध्यमांमुळे ते शक्यच होत नाही. जिथे जाऊ  तिथे सतत कॅमेऱ्याची नजर आमच्यावर असते. त्यामुळे इच्छा असूनही तसं राहता येत नाही, वागताना-बोलताना जपून राहावं लागतं.” अशी खंतही तिने व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif birthday plans djj

Next Story
पं. मनोहर चिमोटे
ताज्या बातम्या