कतरिनाला रडताना पाहून का हसायचा सलमान खान ?

कतरिना रडत सलमानकडे गेल्यानंतर तिची अडचण ऐकून सलमान खूप हसायचा

salman katrina
सलमान खान, कतरिना कैफ

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ. आज तिचा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. कतरिना आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. त्यांची जोडीसुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘भारत’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यांनी ‘युवराज’, ‘एक था टायगर’, ‘मैंने प्यार क्यों किया’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांचा समावेश आहे.

कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून सलमान तिच्यासोबत आहे. ‘फिल्मफेयर’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सलमानशी निगडीत असलेला एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, “एकदा मी खूप निराश झाले होते आणि रडतच सलमानकडे गेले. माझी अडचण ऐकून सलमान खूप हसला.” कतरीना अनुराग बसु यांच्या ‘साया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती.पण, दोन दिवसांनंतर तिला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. यानंतर कतरिना निराश होऊन सलमानकडे गेली. सलमानने तिला समजावले की, “तू कामावर लक्ष केंद्रित कर.” “सलमानने कायमच माझ्यावर विश्वास दाखवला.” असंही कतरिना म्हणाली.

“मी जेव्हा सलमानला भेटून रडायचे तेव्हा नेहमीच सलमान हसत असायचा. मला वाटायचं की, इथे माझं करियर संपणार आहे आणि हा का हसतोय?” त्यावर मला शांत करत तो म्हणायचा की, “या गोष्टी पुढे जाऊन कोणीही लक्षात ठेवत नाही. मला माहितेय की तू खूप मोठी होणारेस. त्यामुळे मेहनत करत राहा.”

आता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये कतरिना झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif birthday salman khan first fil djj

ताज्या बातम्या