scorecardresearch

वरुण धवनच्या शर्टलेस फोटोवर कतरिना कैफची कमेंट चर्चेत, म्हणाली…

वरुण धवननं नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर कतरिना कैफनं केलेली कमेंट बरीच चर्चेत आहे.

katrina kaif, varun dhawan, varun dhawan shirtless photo, katrina kaif comment, varun dhawan instagram, कतरिना कैफ, वरुण धवन, वरुण धवन इन्स्टाग्राम, वरुण धवन फोटो
वरुणनं नुकताच शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यामध्ये वरुणचं नाव घेतलं जातं. त्याच्या फिटनेसचे बरेच चाहते आहेत. त्यामुळे त्याच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. वरुणनं नुकताच शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एवढंच नाही तर त्यावर अभिनेत्री कतरिना कैफनंही कमेंट केली आहे.

वरुणनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वरुण एका यॉटवर असून फोटोमध्ये त्याची फिट बॉडी आणि अॅब्स दिसत आहे. तो या फोटोत रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. इन्स्टाग्रामवर आपला हा फोटो शेअर करताना वरुणनं लिहिलं, ‘मला पाण्याची गरज आहे.’ सोशल मीडियावर वरुणचा हा फोटो बराच व्हायरल झाला आहे.

वरुण धवनच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर एवढी चर्चा सुरू आहे की अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी त्याच्या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकलेले नाहीत. पण यात कतरिना कैफच्या कमेंटनं मात्र सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. तिनं वरुणच्या फोटोवर कमेंट करताना फायर इमोजी पोस्ट केला आहे. अर्थात वरुणच्या फोटोवर कमेंट करण्याची कतरिनाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हे दोघं एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसले आहेत.

वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचं तर, लवकरच तो ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर आणि मनिष पॉल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय त्याचा ‘भेड़िया’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कृती सेननची मुख्य भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Katrina kaif comment on varun dhawan shirtless photo goes viral mrj