लग्नाच्या तयारीसाठी कतरिना नाकारतेय चित्रपट?

की चॅनसोबतच्या ‘कुंग फूँ योगा’ या चित्रपटासाठी करतरिनाची तिची वर्णी लागली होती.

Katrina Kaif, India, tolerant country, Intolerance
कतरिना कैफ, katrina kaif
बॉलीवूडमध्ये आगामी काळात ‘बाजीराव मस्तानी’, ‘दिलवाले’, ‘मोहंजोदडो’ यांसारखे मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का हे सर्व चित्रपट बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ हिने नाकारले होते. बॉलीवूड हंगामाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकी चॅनसोबतच्या ‘कुंग फूँ योगा’ या चित्रपटासाठीही तिची वर्णी लागली होती. मात्र, चर्चेअंती हा चित्रपट कतरिनाऐवजी इलियाना डीक्रूझच्या झोळीत पडला. हे सर्व मोठे चित्रपट कतरिनाने नाकारण्यामागचे कारण, या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लागणारा वेळ असल्याचे म्हटले जातेय. कतरिनाच्या निकटवर्तीयाने यास दुजोरा दिला असून म्हटले की, हो ती निवडक चित्रपट स्वीकारतेय. पण तिच्या लग्नाच्या विचाराबाबत आम्हाला काहीचं माहिती नाही.
बहुतेक अभिनेत्री लग्नानंतर नेमकेचं चित्रपट करताना दिसतात. मात्र, कतरिनाने हे लग्नापूर्वीच आचरणात आल्याचे दिसतेयं. सध्या तिच्या हातात ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ हे दोन चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटात बॉलीवूडमध्ये अजूनही स्थिरस्थावर न झालेले अभिनेते म्हणजेचं आदित्य रॉय कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा तिच्यासोबत दिसतील. या दोघांनीही काही खास ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलीवूडला दिलेले नाहीत. तरी कतरिनाने त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय हा बुचकळ्यात टाकणारा आहे. यामागचे गणित खरंतर सरळ आहे. कतरिनाचा तथाकथित प्रियकर रणबीर कपूर आणि कतरिनाला एकत्र पडद्यावर बघणे आता कंटाळवाणे झालेले आहे. त्यानंतर आले आमिर, सलमान खान, अक्षय कुमार आणि शाहरुख तर या सर्वांसोबत तिने ब-यापैकी काम केलेले आहे. त्यामुळे लग्नापूर्वी पुरुषप्रधान सिनेसृष्टीत आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी सिद्धार्थ आणि आदित्य हे योग्य निवड आहेत. कारण, करिनाने लग्न केल्यानंतर तिने तरुण आणि त्यावेळी नवख्या असलेल्या इमरान खानसोबत काम केले होते. पण लग्नापूर्वीचे ग्लॅमर कायम राखण्यात ती कमी पडली. आणि बहुदा कतरिनासोबत असे काही होऊ नये म्हणून नेमकेच चित्रपट करण्याचा तिने निर्णय घेतला असावा, असे कतरिनाच्या निकटवर्तीयाने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Katrina kaif cutting down on roles in preparation for marriage

Next Story
गोरेपणा ही सौंदर्याची व्याख्या नाही- नवाजुद्दीन सिद्दीकी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी