गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल सातत्याने चर्चेत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून कतरिना आणि विकीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. अखेर ९ डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट या ठिकाणी ते दोघेही विवाहबंधनात अडकले. अवघ्या काही दिवसांपूर्वी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. यानंतर नुकतंच त्या दोघांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

लग्नानंतर त्या दोघांनीही एकत्र नवीन वर्षाचे आनंदात स्वागत केले. पण नववर्षाच्या पहिल्याच रात्री ते दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. एका चित्रपटाच्या शूटींगनिमित्ताने विकी कौशलला परदेशात जायचे असल्याने ते विमानतळावर आले होते. यावेळी कतरिना त्याला निरोप देत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

या व्हिडीओत विकी आणि कतरिना एकाच कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. विमानतळावर गाडी थांबल्यानंतर कतरिनाने विकीला मिठी मारली. त्याला किस केले आणि त्यानंतर विकी कारमधून खाली उतरला. यावेळी कतरिनाने नाईट गाऊन परिधान केला होता. त्यामुळे ती कारमधून खाली उतरली नाही.

‘लागिरं झालं जी’मधील ही अभिनेत्री दिसणार ‘देवमाणूस २’मध्ये

मात्र या दोघांच्या एका कृतीचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. या दोघांनी फक्त विमानतळाजवळ नाही तर गाडीतही पूर्ण वेळ मास्क परिधान केला होता. त्यामुळे त्या दोघांच्या हावभावांव्यतिरिक्त या कृतीनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

यावर अनेकांनी कमेंट करत त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कारमध्ये असूनही दोघांनी मास्क घातलेले आहेत. तर इतर बॉलिवूड जोडपे कोविड संपल्यासारखे जगत आहेत, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एकाने कमेंट करत म्हटले की, हो मास्क न घातल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष जात नाही. म्हणूनच ते काळजी मुक्त होऊन मास्क काढून नाटक करतात. पण कतरिना आणि विकी हे मॅच्युअर आहेत.

दरम्यान कतरिना लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात सलमान खानसोबत झळकणार आहे. सध्या याचे शूटींग बाकी आहे. तर विकी कौशल हा सारा अली खानसोबत ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.