सलमानसोबतच एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही कतरिनाने दिले नाही लग्नाचे आमंत्रण?

कतरिना आणि विकी कौशल ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत.

सलमान खान, विक्की कौशल, रणबीर कपूर, कतरिना कैफ, vicky kaushal, salman khan, ranbir kapoor, katrina kaif vicky kaushal wedding, katrina kaif,

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील किल्ल्यावर शाहीथाटात विकी आणि कतरिना लग्न करणार आहेत. ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी हजर राहणार आहेत. मात्र, कतरिनाने सलमान पाठोपाठ एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला देखील आमंत्रण दिले नसल्याचे म्हटले जात आहे.

कतरिनाने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण दिलेले नाही अशा चर्चा रंगल्या आहेत. पण अर्पिताने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता कतरिनाने तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला देखील लग्नाचे आमंत्रण दिले नसल्याचे म्हटले जात आहे. कतरिना आणि रणबीर अनेक वर्षे रिलेशनशीप मध्ये होते. ते लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आणखी वाचा : कतरिनाने दिले नाही सलमानच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण? अर्पिताने केला खुलासा

खान कुटुंबीयांपाठोपाठ आता कपूर कुटुंबीय देखील लग्नाला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच कतरिना रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट्टला देखील लग्नाचे आमंत्रण देणार नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम याची चाचपणी सध्या करत आहे, असे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif not invited her ex ranbir kapoor and salman khan to her wedding avb

Next Story
Money Heist Part 5 Volume 2: प्रोफेसर सगळ्यांसमोर येत बँकेत अडकलेल्या आपल्या टीमला वाचवणार का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी