सलमानबद्दलच्या प्रश्नावर कतरिनाचा ‘सेफ गेम’

ती गोष्ट आम्ही कधीच विसरलो आहोत.

बॉलिवूड कलाकारांच्या आपापसातील नात्यांविषयक चर्चा सिनेसृष्टीत कायमच रंगत असतात. बॉलिवूडमधील भाईजान सलमान खान व कतरिना कैफ यांच्या नात्याविषयी सुद्धा नेहमीच चर्चा होत असतात. ते दोघे एकत्र आहेत असे त्यांच्या चाहत्यांना वाटत असते. त्यांच्यातील मैत्री ही नक्कीच खास आहे. सलमान व कतरिनाच्या चित्रपटांमधून त्यांची ही ‘खास’ मैत्री दिसून येते. त्यांच्यात चांगली मैत्री आहेच पण त्याही पलीकडे ते एकमेकांना कुटुंबातील सदस्याप्रमाणेच मानतात असे म्हटले जाते.

कतरिनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा दोघांच्या मैत्रीवर प्रकाश टाकला. या मुलाखतीत नेहमीप्रमाणेच तिला सलमान व तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना “ती गोष्ट आम्ही कधीच विसरलो आहोत. आता आमच्यात केवळ मैत्रीचे नाते आहे” असे म्हणाली.

“मी सलमानला गेली १६ वर्षे ओळखत आहे. दरम्यान आमच्यात काही मतभेद नक्कीच झाले मात्र ते किरकोळ स्वरुपाचे होते. आम्ही खुप छान मित्र आहोत. सलमान एक चांगला व्यक्ती आहे. आणि गरजूंना तो नेहमीच मदत करतो. मलाही त्याने अनेकदा मदत केली आहे.” असे उत्तर देत कतरिनाने पुन्हा एकदा सलमानबरोबर असलेल्या नात्यावर स्पष्टीकरण दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif salman khan is my true friend mppg