‘फितूर’मध्ये कतरिना कैफ पाकिस्तानी आणि आदित्य रॉय कपूर काश्मिरी तरूणाच्या भूमिकेत

‘एक था टायगर’ चित्रपटात पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा पाकिस्तानी तरूणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘एक था टायगर’ चित्रपटात पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा पाकिस्तानी तरूणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’ या चित्रपटात कतरिनासोबत आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिकेत असेल. तो या चित्रपटात एका काश्मिरी तरूणाची भूमिका साकारत आहे. ‘फितूर’ हा चित्रपट चार्ल्स डिकन्स यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘ग्रेट एक्सेपटेशन्स’ या कांदबरीचा आधुनिक अवतार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस ‘फितुर’च्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असली तरी, अजूनपर्यंत या चित्रपटाची नेमकी कथा आणि कलाकारांच्या निवडीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनूसार हा चित्रपट तीन मुख्य व्यक्तिरेखांभोवती केंद्रित आहे. यामध्ये फिरदौस (कतरिना) नावाची तरूणी, तिच्या विचारात मग्न असलेला नूर ( आदित्य) हा काश्मिरी तरूण आणि बेगम (रेखा) यांचा समावेश आहे. कतरिना आणि आदित्य कपूर यांनी नुकतेच काश्मिरमधील चित्रीकरण आटोपले असून सध्या दिल्लीत ‘फितूर’चे चित्रिकरण सुरू आहे. अभिनेत्री रेखा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. पुढील वर्षीच्या फेब्रुवारीत ‘फितूर’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय, अजय देवगण आणि लारा दत्ता या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif to play a pakistani aditya roy kapur a kashmiri in abhishek kapoor fitoor

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या