बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांच्या लग्नाला ५ महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर त्या दोघांनी लगेच कामाला सुरुवात केली होती आणि त्या दोघांना एकत्र जास्त वेळ मिळाला नाही. सध्या त्यांच्याकडे काही वेळ असल्याने ते न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या या ट्रीपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या सगळ्यात त्या दोघांनी प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्कमध्ये असलेल्या सोना या रेस्टॉरंटमध्ये हजेरी लावली आहे.

विकी कौशल आणि कतरिना न्यूयॉर्कमध्ये असलेल्या प्रियांकाच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते, त्यावेळी त्यांचे खूप शानदार स्वागत करण्यात आले. त्याचा फोटो कतरिनाने तिच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. “घरापासून दूर, दुसरे घर. प्रियांका तू जे काही करतेस ते अप्रतिम करतेस.” असे कॅप्शन कतरिनाने दिले आहे.

आणखी वाचा : “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है…”, दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

दरम्यान, कतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी जयपुरमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नात कुटुंबातील काही सदस्यांनी आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. कतरिना ‘फोन बूथ’, ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. तर विकी कौशल ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ , ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.