गेल्या महिनाभरापासून सातत्याने चर्चेत असलेल्या अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ आज अखेर विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विकी-कतरिनाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. आज अखेर ते दोघेही सप्तपदी घेणार आहेत. राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाही थाटात ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

विकी-कतरिनाचा विवाह राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित करण्यात आला आहे. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्स सेन्सेस या राजमहालाच्या आवारात एक अतिशय भव्य मंडप तयार करण्यात आला आहे. याच मंडपात लग्नाचे सर्व विधी पार पडणार आहेत.

हेही वाचा : परफेक्ट जोडी…! कतरिना आणि विकीचे ३६ पैकी किती गुण जुळतात, पाहिलं का?

तसेच नववधू आणि वराच्या एंट्रीसाठी रथ आणि घोडाही तयार करण्यात आला आहे. कतरिना कैफ ही पारंपारिक डोलीमध्ये बसून मंडपात एंट्री घेणार आहे. तर विकी कौशल हा घोड्यावर बसून मंडपात प्रवेश करणार आहे.

आज दुपारी साधारण १ वाजता फेटा बांधण्याचा विधी होईल. यावेळी नवरदेवाला अगदी शाही थाटात फेटा बांधला जाईल. यानंतर विकी पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर स्वार होऊन मंडपामध्ये पोहोचेल. संध्याकाळी साधारण ६ च्या दरम्यान विकी-कतरिना सप्तपदी घेतील. विकी-कतरिनाचा संपूर्ण विवाहसोहळा हिंदू रिती रिवाजांनुसार होणार आहे. या लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप राजवाडा शैलीत बांधण्यात आला आहे. तो अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे.

हेही वाचा : विकी-कतरिनाच्या लग्नात राजस्थानच्या ‘या’ ठिकाणाहून आली मेहंदी, तयारीसाठी लागले इतके दिवस

दरम्यान विकी आणि कतरिनाचा मेहंदी सोहळा ७ डिसेंबरला पार पडला. यात भरपूर पंजाबी गाणी आणि ढोल वाजवण्यात आले. तर ८ डिसेंबरला संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर पाहुण्यांसोबतच विकी-कतरिनानेही डान्स केला. यावेळी १०० हून अधिकजण उपस्थित होते.