…म्हणून कतरिना आणि विकीच्या लग्नात रोहित शेट्टी लावणार नाही हजेरी!

कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत.

katrina kaif, vicky kaushal, rohit shetty,
कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नाची तयारी देखील सुरु झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या ठिकाणी हजेरी लावली आहे तर काही सेलिब्रिटी लवकरच पोहोचणार आहेत. या पाहुण्यांच्या यादित दिग्दर्शक रोहित शेट्टीचेही नाव होते. तर आता असे म्हटले जात आहे की कतरिनाकडून विशेष आमंत्रण मिळूणही रोहित त्यांच्या लग्नाला हजेरी लावणार नाही आहे.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. रोहित हा नोव्हेंबर महिन्यापासून उटीमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर लगेच तो सर्कस या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. याच कारणामुळे तो कतरिना आणि विकिच्या लग्नात हजेरी लावू शकणार नाही.

आणखी वाचा : ‘खायला पैसे नव्हते, अक्षरश: बिग बींनी घरात काम करणाऱ्यांकडून पैसे…’, अभिषेकने केला खुलासा

आणखी वाचा : पहिल्यांदा वडिलांनीच दिला होता मद्याचा ग्लास आणि ४ बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, ट्विंकलने केला होता खुलासा

दरम्यान, कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या ठिकाणी ’83’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आणि त्यांचे कुटुंब पोहोचले आहे. कबीर खान आणि कतरिना यांचे चांगले संबंध असून त्यांच्याच ऑफिसमध्ये कतरिना आणि विकिचा रोका झाल्याच्या चर्चा आहेत. कतरिना आणि विकीचे लग्न राजस्थानमध्ये होणार आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल व्हायला नको म्हणून त्यांनी लग्नात नो फोन ही पॉलिसी ठेवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif vicky kaushal wedding rohit shetty decides to skip the marriage despite special invitation know why dcp