कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नाची ‘वेलकम नोट’ व्हायरल; ‘या’ गोष्टीला नसेल परवानगी, पाहुण्यांना दिली तंबी!

कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची वेलकम नोट व्हायरल झाली असून त्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना ‘तंबी’ देण्यात आली आहे.

katrina kaif vicky kaushal wedding welcome note
कतरीना आणि विकीच्या लग्नाची वेलकम नोट व्हायरल!

बी टाऊनमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे ती बोल्ड अँड ब्युटिफुल कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाची! मग ती चर्चा कतरिनाच्या लग्नाला सलमान खान गैरहजर राहण्यापासून ते त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च आणि कमालीची गुप्तता इथपर्यंत प्रत्येक गोष्टीवर चर्चा सुरू झाली आहे. त्या दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत ही गुप्तता पाळली आहे. हे दोघे राजस्थानमधल्या रिक्स सेन्स फोर्टवर विवाहबंधनात अडकणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यासाठी दोघेही सहकुटुंब राजस्थानला रवाना झाले असून येत्या ९ डिसेंबर रोजी दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडणार आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये त्यांच्या लग्नाची वेलकम नोट भलतीच व्हायरल झाली आहे. विशेषत: अत्यंत गोड शब्दांमध्ये त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांना दिलेली तंबी चर्चेचा विषय ठरत आहे!

कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नासाठी राजस्थानमध्ये सहकुटुंब दाखल झाले आहेत. त्यांचे बरेच पाहुणे देखील लग्नाच्या विविध कार्यक्रमांसाठी राजस्थानमध्ये आले आहेत. या पाहुण्यांसाठी भावी दांपत्यानं राजस्थानमध्ये विवाहस्थळाच्याच आसपास हॉटेलांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. या पाहुण्यांसाठी एक वेलकम नोट देखील या जोडप्यानं दिली असून त्यामध्ये पाहुण्यांचं स्वागत करण्याबरोबरच लग्न कार्यक्रमांना उपस्थिती लावताना कोणती गोष्ट करायची नाही, याविषयी देखील तंबी देण्यात आली आहे.

काय म्हणते वेलकम नोट?

या वेलकम नोटचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. “अखेर तुम्ही इथे आला आहात. जयपूरपासून रणथंबोरपर्यंतची रोड ट्रीप तुम्ही एन्जॉय कराल, अशी आम्हाला आशा आहे! तुमच्यासाठी व्यवस्था करण्यात आलेल्या रिफ्रेशमेंटचा आनंद घ्या”, असं या नोटमध्ये म्हटलं आहे.

katrina kaif vicky kaushal wedding welcome note
कतरीना आणि विकीच्या लग्नाची वेलकम नोट व्हायरल!

…तर लग्नाच्या शूटींगमधूनच विकी-कतरिना करणार १०० कोटी रुपयांची कमाई?

स्वागतासोबतच पाहुण्यांना दिली तंबी!

दरम्यान, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी पाहुण्यांचं स्वागत करताना विवाहाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना एक गोष्ट टाळण्याची तंबी दिली आहे. “निवांत बसा आणि या धम्माल गोष्टीचा आनंद लुटा! आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे फोन आपापल्या खोल्यांमध्येच ठेवावेत. कोणत्याही विधी वा कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर टाकू नका. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत. रिगार्ड्स..शादी स्क्वाड”, असं या वेलकम नोटमध्ये म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif vicky kaushal wedding welcome note viral no to mobile phones social media pmw

ताज्या बातम्या