बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं शेवटचं शेड्युल बाकी असून आता सलमान खान आणि कतरिना कैफ नुकतेच या शूटिंगसाठी दिल्लीला रवाना झाले. विकी कौशलशी लग्न केल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदा सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे. अशात आता खासगी विमानानं दिल्लीला रवाना झालेल्या कतरिना आणि सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

विमानतळाच्या बाहेरील कतरिना कैफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात कतरिना कैफ आणि सलमान खान आपापल्या कारमधून उतरून विमानतळावर जाताना दिसत आहेत. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना त्यांनी पोझ दिली. सलमान आणि कतरिनाचा हा व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Viral Video The Air India staff who loads the luggage on the plane throws passenger musical instruments
धक्कादायक! सामान विमानात चढवताना प्रवाशाचे वाद्य दिलं फेकून; एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा ‘हा’ VIDEO पाहाच
salman khan off to dubai_cleanup
Video: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच सोडली मुंबई, विमानतळावरील व्हिडीओ आले समोर
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

‘टायगर ३’चं मुंबईमधील शूटिंग संपल्यावर सलमान खान आणि कतरिना कैफ लगेचच दिल्लीला रवाना होतील अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र त्यावेळी करोनामुळे हे शूटिंग पुढे ढकलण्यात आलं. दिल्लीतील या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण होताच ‘टायगर ३’चं शूटिंग देखील पूर्ण होईल.

‘टायगर ३’च्या दिल्ली शेड्युलच्या शूटिंगचा कालावधी १५ दिवसांचा असल्याचं बोललं जात आहे. ज्यात चित्रपटातील चेंज सीक्वेन्सवर काम केलं जाणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ हे शूटिंग लाल किल्ल्याजवळ करणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.