कतरिना कैफने विकी कौशलच्या भावाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ. गेल्या महिन्यातच विकी आणि कतरिनाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावरून त्यांना अनेकांनी शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली होती. गेल्या दोन वर्षांपासून विकी आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. अद्याप दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीरपणे खुलासा केलेला नाही. असं असलं तरी अनेक […]

katrina-kaif-vicky-kaushal-sunnny-kaushal
(Photo-Instagram@sunnykaushal/File)

बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ. गेल्या महिन्यातच विकी आणि कतरिनाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावरून त्यांना अनेकांनी शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली होती. गेल्या दोन वर्षांपासून विकी आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. अद्याप दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीरपणे खुलासा केलेला नाही. असं असलं तरी अनेक इव्हेंट तसचं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये विकी आणि कतरिनाला एकत्र स्पॉट करण्यात आलंय.

तर मंगळवारी २८ सप्टेंबरला विकीचा भाऊ सनीला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने कतरिनाने खास शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. कतरिनाने तिच्या इन्टास्टोरीला सनीचा एक फोटो शेअर केलाय. यात “हॅपी बर्थ डे सनी, मी देवाकडे प्रार्थना करेन की तुझे सर्व दिवस प्रेम आणि आनंदाचे जावो” असं तिने म्हंटलंय. तर अभिनेता विकी कौशलने देखील इन्स्टास्टोरीला भावाचा एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ” हॅपी बर्थडे मेरे जिगर के तुकडे” असं कॅप्शन विकीने दिलंय.

KBC 13: स्पर्धक महिलेने पतीची केली बदनामी, संतापलेल्या पतीने पत्नीसह चॅनलवर केला गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वीच विकीचा भाऊ सनी कौशलने विकी आणि कतरिनाच्या साखरपुड्याच्या अफवांवर कुटुंबियांची प्रतिक्रिया कशी होती याचा खुलासा केला होता. विकीच्या साखरपुड्याची बातमी ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच हसू आवरण कठीण झाल्याचं सनी म्हणाला. विकीचे आई-वडील त्याला “साखरपुड्याची मिठाई दिली नाहीस तू” असं मजेत म्हणायचे असा खुलासा सनीने केला होता.

‘शमशेरा’ सिनेमातील रणबीर कपूरचा फर्स्ट व्हायरल, हटके लूक सोशल मीडियावर चर्चेत

दरम्यान सध्या कतरिना ‘टायगर ३’ सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तर विकी लवकरच ‘सरदार उधम सिंह ‘ या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा अॅमेझान प्राईमवर १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif wish vicky kaushal brother sunny on his birthday post goes viarl kpw

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी