माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. बऱ्याच वेळा ते हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारताना त्यांच्या जीवनातील किस्से सांगताना दिसतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये बॉलिवूडचा भीडू अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टीने हजेरी लावली. पण त्यांना २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी या प्रश्नासाठी एक्सपर्टचा सल्ला घेतला होता. तुम्ही देऊ शकाल का या प्रश्नाचे उत्तर?

कौन बनेगा करोडपती १३च्या शुक्रवारी पार पडलेल्या भागामध्ये जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन हे मजा मस्ती करताना दिसत होते. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शोमध्ये सांगितल्या. तसेच सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांची मैत्री लहानपणापासून असल्याचे त्यांनी सांगितले. इतकच नाही तर सुनील शेट्टी त्याचे नवीन कपडे पहिले जॅकी श्रॉफ यांना परिधान करायला देत असल्याचे सांगितले.

आणखी वाचा : आईच्या आठवणीत जॅकी श्रॉफ यांना कोसळले रडू, सुनील शेट्टी आणि बिग बी झाले भावूक

दरम्यान जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांना २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नव्हते. त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न-
विवेकानंद योग विश्वविद्यालय जे भारता बाहेरील देशातील पहिले योग विश्वविद्यालय आहे ते यूएसच्या कोणत्या शहरात जून २०२०मध्ये लाँच केले गेले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी एक्सपर्टचा सल्ला घेतला. या प्रश्नाचे उत्तर लॉस एंजेलिस असे आहे. जॅकी आणि सुनील यांनी शोमध्ये जिंकलेली संपूर्ण रक्कम लोकांच्या मदतीसाठी दिली आहे.