…म्हणून बिग बींनी टेकले प्रियांकासमोर हात

‘१९ वर्षांच्या इतिहासामध्ये असा स्पर्धक पाहिला नाही’

अमिताभ बच्चन

अॅग्री यंग मॅन, शहेनशहा, बिग बी, महानायक अशा एक ना अनेक नावांनी लोकप्रिय असलेले अमिताभ बच्चन गेले कित्येक वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. उत्कृष्ट अभिनयशैली आणि संवादकौशल्य यांमुळे आज ते अनेकांचा आदर्श आहेत. मात्र अस असतानादेखील बिग बींना चक्क एका तरुणीसमोर हात टेकावे लागले आहेत.

अमिताभ बच्चन आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ यांचं एक अतूट नातं निर्माण झालं आहे. या शोने आतापर्यंत अनेकांना करोडपती होण्याचं स्वप्न दाखवलं. तर काहींचं स्वप्नही या शोने पूर्ण केलं. अलीकडेच या शोमध्ये प्रियांका जून या तरुणीने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या शोमध्ये तिने प्रश्नांची जी उत्तरे दिली ती पाहून बिग बींनी तिच्यासमोर हात टेकले.

हरियाणातील झज्जरमध्ये राहणारी प्रियांकाने शो मध्ये विचारलेल्या प्रश्नांची भन्नाट आणि तितक्याच बेधडकपणे उत्तरे दिली. इतकंच नाही तर अगदी १ लाख ६० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचलेल्या प्रियांकाने चुकीचं उत्तर दिल्यामुळे तिला केवळ १० हजार रुपये घेऊन परतावं लागलं. मात्र तिच्या कॉन्फिडन्सपासून बिग बींनी हात जोडले आणि १९ वर्षांच्या इतिहासामध्ये असा स्पर्धक पाहिला नाही, असं म्हटलं.

दरम्यान, प्रियांकाने या शोमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या चारही लाईफलाईन्स वापरल्या मात्र तरीदेखील तिला केवळ १० हजार रुपयेच परत घेऊन जावे लागले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kaun banega crorepati kbc season 11 haryana girl shocked amitabh bachchan during ssj

Next Story
गॉसिप