“संपूर्ण जग बदललं”, ‘केबीसी’चे एक हजार एपिसोड पूर्ण झाल्यानंतर बिग बी भावूक

‘कौन बनेगा करोडपती’चा १३वा सिझन सुरु असून या शोने एक हजार एपिसोडचा टप्पा गाठला आहे.

big-b-shweta-navya

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ने नवा इतिहास रचला आहे. या शोने एक हजार एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. २००० सालामध्ये सुरु झालेल्या या शोचा सध्या १३वा सिझन सुरु असून या सिझनमध्ये या शोने एक हजार एपिसोडचा टप्पा गाठला आहे. आजवर या शोमध्ये अनेकांचं भाग्य उजळलं आहे. कुणी करोडपती बनलं कुणी सात करोड जिंकले तर कुणी लखपती बनलं. अनेकांनी या शोमध्ये मोठी रक्कम जिंकली नसली तरी त्यांची स्वप्न पूर्ण केली. तसचं काहींनी तर बिग बींच्या भेटीतच समाधान व्यक्त केलंय.

या शोच्या एक हजार एपिसोड पूर्ण करण्याच्या निमित्ताने शोमध्ये बिग बींची लेक श्वेता बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदाने खास हजेरी लावली होती. यावेळी ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा आतापर्यंतचा प्रवास पाहून बिग भावूक झाले होते.

लोकप्रिय तेलगू कोरिओग्राफर शिवा शंकर याचं करोनामुळे निधन, सोनू सूदने शेअर केली भावूक पोस्ट

सोशल मीडियावर केबीसीचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. ज्यात श्वेता बच्चन आणि नव्या हॉट सीटवर बसलेल्या दिसत आहेत.यावेळी श्वेता बच्चनने बिग बींना एक हजार एपिसोड पूर्ण केल्याबद्दल प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ बच्चन काहिसे भावूक झाले. “असं वाटतंय संपूर्ण जग बदललं”

सोनी टीव्हीने शेअर केलेल्या या व्हिडीओत ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा २१ वर्षांचा प्रवास आणि या प्रवासातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत. हा शाक भाग शुक्रवारी प्रसारित होणार आहे. तर या भागात बिग बी मुलगी श्वेता आणि नात नव्यासोबत खेळाची मजा लुटताना दिसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kaun banega karodpati completes 1000 episodes amitabh bachchan became emotional kpw

Next Story
किती रोमँटिक..! विराटनं शेअर केला अनुष्कासोबतचा ‘खास’ फोटो; म्हणाला, “जेव्हा तू माझ्यासोबत असतेस…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी