टीव्हीवरील लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती १३’ चा बुधवारचा भाग लखनौच्या अमन बाजपेयी याच्यापासून सुरू झाला. फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये सगळ्यात आधी उत्तर देत अमन हॉट सीटवर पोहोचला. लखनौचा अमन सध्या शिकत आहे. पण त्याला फॅमिली रेस्टॉरंट सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. या शोमधून जिंकलेल्या पैशाने ते आपलं स्वप्न पूर्ण करणार आहे.

१२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नावर अमनने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर अमनने हातात असलेल्या सर्व लाइफलाइन संपवल्या होत्या. त्यानंतर त्याने आणखी कोणतीही रिस्क घेतली नाही आणि खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. अमन ६ लाख ४० हजारांची रक्कम जिंकून घरी परतला. नेमका तो प्रश्न काय होता आणि त्याचं योग्य उत्तर काय होतं ? जाणून घेऊयात.

हा होता प्रश्न ?
१९९३ आणि १९९६ मध्ये कार्यरत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोन होते?
– जस्टिस जे एस वर्मा
– जस्टिस ए एम आनंद
– जस्टिस रंगनाथ मिश
– जस्टिस एम एन वेंकटचलैया

 


या प्रश्नाचं उत्तर देताना अमन थोडा गोंधळला. हातातल्या सर्व लाइफलाइन संपल्यानंतर अमनकडे विचारपूर्वक योग्य देण्यापलिकडे कोणताच शिल्लक राहिलेला नव्हता. जर उत्तर चुकीचं निघालं तर ती देखील मोठी रिस्क होती. त्यामुळे अमन यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचं योग्य उत्तर ‘न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा’ होतं. एका माध्यमाशी बोलताना अमन म्हणाला, “मी 18 वर्षांचा असल्याने मला KBC मध्ये सहभागी होण्यास सांगितले गेलं.”