‘लग्नाचा वाढदिवस विसरलो तर…’, जया बच्चन काय करतात अमिताभ यांनी केला खुलासा

अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती १३’ मध्ये स्पर्धकाशी बोलताना हा खुलासा केला आहे.

jaya bachchan, amitabh bachchan,
अमिताभ यांनी 'कौन बनेगा करोडपती १३' मध्ये स्पर्धकाशी बोलताना हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ या शो सुत्रसंचालन करत आहेत. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ वे पर्व सुरु आहे. या शो दरम्यान, स्पर्धकांशी गप्पा मारत असताना अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. यावेळी अमिताभ यांनी पत्नी जया बच्चन यांच्या विषयी एक खुलासा केला आहे.

गेल्या एपिसोडमध्ये आदित्य बोस नावाचे स्पर्धक हॉटसीटवर होते. आदित्य हे दिल्लीचे असून त्यांचं करिअर-काउंसिलरचं एक स्टार्ट-अप आहे. यावेळी अमिताभ यांनी करिअरच्या सुरुवातीला आणि खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले. त्यावेळी अमिताभ म्हणाले की जया या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी होतात. त्यांना महागड्या भेटवस्तूंचा विचार करत नाही आणि त्यांना साधे जीवन जगायला आवडते.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ या मालिकेचे खरे चाहते असाल तर फोटोमधील चंपकलालला ओळखून दाखवाच

आणखी वाचा : काजोलचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी जावेदशी तुलना म्हणाले…

तर, कौन बनेगा करोडपतीच्या ११ व्या एपिसोडमध्ये बिग बींनी जया यांचं नाव मोबाइलमध्ये काय सेव्ह केलं आहे ते सांगितलं होतं. JB या नावाने त्यांनी जया बच्चन यांचे नाव सेव्ह केले आहे. अमिताभ आणि जया यांचे लग्न १९७३ साली झाले आहे. त्यांच्या लग्नाला ४८ वर्षे झालेत तरी, आजही जर अमिताभ त्यांच्या लग्नाचा वाढदिवस विसरले तर जया त्यांची मस्करी करतात आणि कधी कधी तर ते ओरडतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 amitabh bachchan revealed in show that wife jaya bachchan does not like expensive gifts dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या