‘कौन बनेगा करोडपती’ या शोला विशेष महत्व प्राप्त झालंय ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे. बॉलिवू़डचे महानायक हा शो होस्ट करत असल्यामुळे या शोला चार चाँद लागले आहेत . या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. तसचं प्रेक्षकांचं ज्ञान वाढवणाऱ्य़ा या शोमध्ये अनेक स्पर्धक त्यांचे अनुभव शेअर करत असतात.
या शोच्या येत्या भागात दिल्लीतील सुमित कौशिक हॉटसीटवर बसलेले दिसणार आहेत. यावेळी बिग बी आणि सुमित कौशिक तसचं त्याच्या कुटुंबियांनी बिग बींसोबत मनसोक्त गप्पा मारल्या आहेत हे शोच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. मात्र यावेळी सुमित यांनी एक असा शब्द वापरला की जो ऐकून बिग बींना धक्काच बसला. सुमितने वापरलेला शब्द शिवी असल्याचं त्यांना वाटलं. मात्र हा शब्द शिवी नसून कौतुक किंवा स्तुती करण्यासाठी वापरण्यात येणारं एकाप्रकारचं विशेषण असल्याचं सुमितने पटवून दिलं.
एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला देता येईल का? या प्रश्नाचं उत्तर
सुमितने आपण समोसा प्रेमी असल्याच सांगत असतानाच एका विशिष्ट ठिकाणाचा समोसा त्यांला प्रचंड आवडतं असल्याचं तो म्हणाला. यावेळी तिथला समोसा ‘जेहर समोसा’ असल्याचा उल्लेख त्याने केला. यावेळी जेहेर म्हणजेच विष हा शब्द ऐकून बिग बी काही वेळासाठी स्तब्ध झाले. हा शब्द म्हणजे शिवी असल्याचं ते म्हणाले. यावर सुमितने हा शब्द कौतुकासाठीदेखील वापरू शकतो असं म्हंटलं. “माझी बंडी पाहिलीस का? कसा दिसतोय” या बिग बींच्या प्रश्नावर सुमितने बिग बींना ‘जेहेर लग रहे हो’ असं म्हणताच एकच हशा पिकला. ‘आज नवं ज्ञान मिळालं’ असं बिग बी म्हणाले.
“आमिर सारखं तुझं लग्नही टिकणार नाही”, नेटकऱ्याच्या कमेंटवर रिचा चड्ढा भडकली
यावेळी सुमितने जेव्हा त्याची आई बागबान सिनेमा पाहतात तेव्हा खूप भावूक होत असल्याचं सांगितलं. तसचं या भावूक होण्यामागचं कारण देखील त्याने सांगितलं. हे कारण ऐकून देखील बिग बिंना हसू अनावर झाला. या शोचा हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.