छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. तर शोमध्ये हजेरी लावणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो रुपये जिंकतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे खेळ सोडला.

काल प्रदर्शित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या एपिसोडमध्ये मध्य प्रदेशच्या झाबुका जिल्ह्यातील हंसु रविदास यांनी ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. हंसु यांना १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते आणि त्यांच्याकडे कोणती लाइफ लाइन देखील नव्हती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता त्यांनी १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न देता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. हंसु यांच्या कुटुंबावर ६ लाख रुपयांचे कर्ज आहे आणि आता त्यांनी ६ लाख ४० हजार रुपये जिंकल्याने त्यांचे सगळे कर्ज संपेल असे त्यांचे म्हणणे आहे.

महाराजा रणजीत सिंह यांनी भारताचा नकाशा पाहिल्यानंतर ‘एक दिवस सर्व लाल होईल’ या विधानामध्ये लाल रंग काय दर्शवतो?


A) महाराजाचा स्वतःचा प्रदेश B) ब्रिटिश प्रदेश C) महामारी प्रभावित क्षेत्र D) लाल मातीचे क्षेत्र

या प्रश्नाचे अचुक उत्तर B) ब्रिटिश प्रदेश आहे. पण हंसु यांना योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचे पर्यंत त्यांच्या सगळ्या लाइफलाइन संपल्या होत्या.

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

हंसु यांनी हा खेळ सोडल्यानंतर मनीषा शर्मा या हॉटसीटवर बसल्या. मनीषा या २६ वर्षांच्या आहेत. त्या छत्तीसगडमधील एका ई-कॉमर्स कंपनीत काम करतात. त्यांनी ३ हजार रुपयांच्या प्रश्नासाठी पहिली लाइफलाइन वापरली. त्यानंतर त्यांनी १० हजार रुपयांच्या प्रश्नासाठी दुसरी लाइफलाइन वापरली.