छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपति १३’ या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड असतो. या एपिसोडमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली होती. तर या दोघांनी आमिताभ यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या आणि त्यांनी बिग बींना त्याच्या ४५ वर्षांच्या या मैत्री विषयी अनेक खास गोष्टी सांगितल्या.

जॅकी श्रॉफ यांनी सांगितले की सुनील शेट्टी यांनी प्रत्येक कठीण काळात त्यांना मदत केली. त्यांचे वडील काकूभाई हरिभाई श्रॉफ आजारी असताना त्यांच्या छोट्या घरात त्यांची काळजी घेणे कठीण होते. त्यावेळी सुनील यांनी जॅकी यांना त्यांचे घर दिले होते.

nagpur, truck driver kidnapped minor girl, police, solved case
ट्रक चालकांकडून अल्पवयीन; मुलीचे अपहरण, तीन तासांत छडा
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Rishi Sunak Trolled For Shoes
ऋषी सुनक यांनी ‘अडिडास’चे स्नीकर्स घातले नी सोशल मीडियावर गजहब झाला; मागावी लागली माफी

पुढे त्यांच्या वडिलांच्या आजाराविषयी सांगताना जॅकी म्हणाले, ‘जेव्हा माझ्या वडिलांना पेनिसिलिनची रिअॅक्शन झाली होती, त्यावेळी त्यांची त्वचा निघायची, तेव्हा घरात बरेच लोक होते आणि लहान खोलीत ते हाताळू शकत नव्हते. तेव्हा सुनीलने त्याचे घर दिले होते आणि सांगितले होते की वडिलांना इथे ठेव. तर जिथे तुम्ही मीरामारचे चित्रीकरण करत होतात, तिथे मी वडिलांना ठेवले होते. सुनीलच्या त्या घरी १० ते १५ दिवस आम्ही होतो. तो तिथे राहत नव्हता. त्याचे घर त्यांनी रिकामे केले आणि त्यांनी तिथेच राहा असे सांगितले आणि त्यामुळे आमच्यातली बॉंडिंग वाढली.’

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

पुढे जॅकी म्हणाले, ‘सुनील यांचे कपड्यांचे दुकान देखील होते आणि जॅकीयांच्यासाठी कपडे देखील राहू द्यायचे. त्यांच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये जॅकी सुनील यांच्याकडून कपडे घ्यायचे. सुनील त्या कपड्यांवर एक निशान करून ठेवायचे, जेणेकरून जॅकी जेव्हा कपडे घ्यायला येतील तेव्हा त्यांच्यासाठी कोणते कपडे आहेत हे त्यांना कळेल.’

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी ३’ तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात इंदुरीकर महाराजावरून वाद

जॅकी आणि सुनील यांनी २५ लाख रुपये जिंकले. हे पैसे जॅकी ‘थॅलेसेमिक्स इंडियाला’ दान करणार आहेत तर सुनील ‘विपला’ फाऊंडेशनला दान करणार आहेत. या आधी शानदार शुक्रवारमध्ये सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागने हजेरी लावली होती. तर गणेशोत्सव आणि शानदार शुक्रवारच्या निमित्ताने दीपिका पादूकोण आणि फराह खानने हजेरी लावली होती. तर गेल्या आठवड्यात गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेश यांनी हजेरी लावली होती.