छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. तर शोमध्ये हजेरी लावणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो रुपये जिंकतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे खेळ सोडला.

काल प्रदर्शित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या एपिसोडमध्ये गुजरातमधून आलेल्या नम्रता अजय शाह या हॉटसीटवर होत्या. नम्रता यांना ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते आणि त्यांच्याकडे कोणती लाइफ लाइन देखील नव्हती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता त्यांनी ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न देता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या २५ लाख रुपये जिंकल्या. यासोबत, त्यांनी शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या. एवढंच नाही तर अमिताभ यांनी नम्रता यांच्या डान्सची स्तुती देखील केली.

जगात कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज सर्वात आधीपासून वापरला जात आहे? म्हणजेच जगातील सर्वात जुना मान्यता प्राप्त राष्ट्रध्वज कोणता?

A) यूनान B) फिनलँड C) डेनमार्क D) आइसलँड

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

या प्रश्नाचे अचुक उत्तर C) डेनमार्क आहे. पण नम्रता यांना योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच ५० लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचे पर्यंत त्यांच्या सगळ्या लाइफलाइन संपल्या होत्या.

आणखी वाचा : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसाठी असलेला प्रामाणिकपणा पाहून, नेटकऱ्यांनी केली त्यांच्या बॉडीगार्डची स्तुती

खेळादरम्यान नम्रता यांनी अमिताभ यांच्याशी खूप गप्पा मारल्या. त्यांचा मुलगा लवकरच वडील होणार आहे, अशा स्थितीत नम्रता यांनी अमिताभ बच्चन यांना बाळाचे नाव ठेवण्याची विनंती केली. याशिवाय नम्रता यांनी सेटवर कथ्थक डान्स केला. नम्रता यांनी ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोर परदेसिया’ या गाण्यावर डान्स केला. नम्रताचा डान्स पाहून अमिताभ म्हणाले, इतक्यावेळा गोल फिरुन तुम्हाला चक्कर येत नाही का? यावर नम्रता अमिताभ यांना म्हणाल्या, जर तुमचं लक्ष हे फक्त एकाच ठिकाणी असेल तर तुम्हाला चक्कर येत नाही.