KBC 13: ‘या’ प्रश्नाचं उत्तर देत नीरज चोप्रा आणि श्रीजेशने जिंकले २५ लाख; तुम्हाला उत्तर माहितीये का?

नीरज आणि श्रीजेशने ‘केबीसी १३’ मध्ये हजेरी लावल्यानंतर अमिताभ यांच्यासोबत त्यांच्या संघर्षाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.

kbc 13, pr sreejesh, neeraj chopra, amitabh bachchan,
नीरज आणि श्रीजेशने 'केबीसी १३' मध्ये हजेरी लावल्यानंतर अमिताभ यांच्यासोबत त्यांच्या संघर्षाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.

छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपति १३’ या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड असतो. यावेळी टोक्यो ऑल्मिपिकमध्ये भारतासाठी पदक मिळवत आपल्या देशाचे नाव उंच करणारा भारताचा गोल्डन बॉय आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेश यांनी हजेरी लावली आहे. यावेळी या दोघांनी ही अमिताभ यांच्यासोबत गप्पा मारल्या. एवढंच नाही तर त्यांनी २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

नीरज आणि श्रीजेश दोघांनी त्यांच्या खेळाविषयी आणि त्यांच्या संघर्षा विषयी अनेक गोष्टी सांगितल्या. नीराजे आणि श्रीजेश यांनी १२. ५ लाखाच्या प्रश्नासाठी फ्लिप द क्वेश्चन ही लाईफलाईन वापरली. हा प्रश्न सैन्याशी संबंधीत होता. ‘आपल्या देशात बनवलेल्या बॅटल टॅंकचे नाव काय आहे?’ असा प्रश्न होता. याचं उत्तर ‘अर्जुन’ असं होतं. त्यांनी या प्रश्नासाठी लाईफलाईन वापरली. त्यानंतर हे दोघे पुढच्या प्रश्नाचे अचुक उत्तर देत २५ लाख रुपयांच्या प्रश्नाकडे वळले.

आणखी वाचा : KBC 13 : किपिंग पॅडसाठी वडिलांनी विकली होती गाय…, श्रीजेश झाला भावूक

२५ लाखसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला?

२५ डिसेंबर २०१९ रोजी, भारतीय रेल्वेने कोणती नवीन ट्रेन सेवा सुरू केली ज्याचे सगळे कोच हे व्हिस्टाडोम आहे?

A) जन शताब्दी एक्सप्रेस
B) डेक्कन एक्सप्रेस
C) हिमालयन क्वीन
D) हिम दर्शन एक्सप्रेस

आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

असे चार पर्याय देण्यात आलेले. या प्रश्नाचे हिम दर्शन एक्सप्रेस हे अचुक उत्तर देत त्या दोघांनी २५ लाख रुपये जिंकले. दरम्यान, या आधी ‘शानदार शुक्रवार’मध्ये सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागने हजेरी लावली होती. तर गणेशोत्सव आणि शानदार शुक्रवारच्या निमित्ताने दीपिका पादूकोण आणि फराह खानने हजेरी लावली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 neeraj chopra pr sreejesh answered this question to win rs 25 lakh can you dcp

ताज्या बातम्या