KBC 13:बिग बी अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केली राजकुमार रावच्या आईची ‘ही’ शेवटची इच्छा पूर्ण

२०१६ सालामध्ये अभिनेता राजकुमार रावच्या आईचं निधन झालं आहे. या शोमध्ये राजकुमारने आईच्या आठवणींना उजाळा दिला

‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमध्ये दर शुक्रवारी विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. यंदाच्या शानदार शुक्रवारच्या स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेता राजकुमार राव आणि क्रिती सेनॉनने खास हजेरी लावली होती. यावेळी क्रिती आणि राजकुमारने बिग बींसोबत गप्पा मारत धमाल केली आहे. या शोमध्ये मनसोक्त गप्पा मारत असताना राजकुमार रावने एक किस्सा शेअर केला ज्यामुळे बिग बींसह सर्वच भावूक झाले.

२०१६ सालामध्ये अभिनेता राजकुमार रावच्या आईचं निधन झालं आहे. या शोमध्ये राजकुमारने आईच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने त्याची आई देखील बिग बींची मोठी चाहती असल्याचं सांगितलं. त्याच्या आईला बिग बींना भेटण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

आर्यन खानच्या जामिनासाठी जुही चावला असणार जामिनदार

या भागात राजकुमार म्हणाला, “माझी आई तुमची मोठी चाहती होती. जेव्हा आईचं लग्न झालं तेव्हा ती सासरी एक मोठं पोस्टप घेऊन आली होती. हे पोस्टर अमिताभ बच्चन याचं होतं. आईने ते पोस्टर बाबांच्या बेडरुममध्ये लावलं होतं. यावेळी बाबांही आश्चर्यचकीत झाले होते.” असं राजकुमारने सांगितलं.

पुढे राजकुमारने आईच्या निधनाच्या वेळीचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “आईचं निधन झालं त्यावेळी मी न्यूटन सिनेमाचं शूटिंग करत होतो. तिला मुंबईत येताच आलं नाही त्यामुळे बिग बींना भेटण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्याच दिवशी रात्री मी बिग बींना संपर्क केला आणि सांगितलं की कृपया शक्य झालं तर माझ्या आईसाठी एक व्हिडीओ बनवून पाठवा. हा व्हिडीओ फक्त त्यांच्यात आणि आईमध्ये राहिल नंतर मी तो डिलीट करून टाकेन. मी तिच्या फोटोला हा व्हिडीओ दाखवेन कारण तिला त्यांना भेटायचं होतं.”

पुढे तो बिग बींना म्हणाला, “त्यानंतर तुम्ही तो व्हिडीओ पाठवला. मी तो तिच्या फोटोसमोर प्ले केला आणि नंतर माहित नाही तो पेन ड्राईव्ह मधून आपोआप डिलीट झाला.” राजकुमारने सांगितलेला हा किस्सा ऐकून क्रितीसह बिग बी देखील भावूक झाले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 rajkumar rao share his past mother memory big and kriti senon get emotional kep

ताज्या बातम्या